Latur Accident: पोलीस होण्याचं लहानपणापासूनचं स्वप्न अपूर्ण राहिलं! सरावादरम्यान भरधाव वाहनाची धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

सूरज अशोक कांबळे अस मयत तरुणाचे नाव आहे.
Latur News
Latur NewsSaam TV

लातूर : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. लातूरमधील औसा राष्ट्रीय महामार्गावर बुधोडा गावाजवळील आलमला मोड येथे ही घटना घडली आहे. सूरज अशोक कांबळे अस मयत तरुणाचे नाव आहे. आणखी एकजण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज रोज सकाळी पोलीस भरतीसाठी सराव करत असेल. नेहमीप्रमाणे आजही तो घराबाहेर पडला पण घरी परतलाच नाही. सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजला भरघाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

Latur News
Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांसह १८ जणांवर दंगलीचे गुन्हे दाखल, बुलडाण्यातील शेतकरी आंदोलन चिघळल्याप्रकरणी कारवाई

लहानपणापासून सूरजला पोलिस खात्याचे आकर्षण असल्याने तो पोलिस भरतीसाठी दररोज धावणे आणि अन्य शारीरिक कसरती करण्यासाठी पहाटे चार वाजल्यापासून मेहनत करत असे. आज दररोजच्या प्रमाणे व्यायाम करण्यासाठी आलमला मोड येथे गेला होता.

Latur News
Megablock News: मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक चेक करा

दरम्यान औसाकडून लातुरकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाने भरघाव धडक दिली असता सूरज याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला एक मित्र जखमी झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com