Monsoon Delays in Maharashtra  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला; IMD कडून धडकी भरवणारी अपडेट

Maharashtra Rain Update By IMD: मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.

Satish Daud

मान्सूनबाबत भारतीय हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नसल्याने मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आहे. परिणामी पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा खंड राहण्याची शक्यता आहे. २० जूननंतरच पावसाचा जोर वाढेल, असंही हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्लाही देण्यात आला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. मुंबईतही दोन दिवस आधीच मौसमी वाऱ्यांचं आगमन झालं. मान्सूनचे आगमन होताच राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोकण, सिंधुदुर्गात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे बळीराजा सुखावला.

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्येही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली. सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील अमरावती, चंद्रपूरसह उत्तर महाराष्ट्रातील जळगावपर्यंत झाला आहे. मात्र, हवेच्या दाबाची स्थिती अनुकूल नल्याने वाऱ्यांचा वेग मंदावला आहे.

त्यामुळे मान्सूनला संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्यास अजून काही दिवस लागणार आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड पडू शकतो. २० जूननंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत ६ इंच खोलवर ओल गेल्याशिवाय बियाणे रोवू नये, असं सांगण्यात आलं आहे.

आज कुठे कुठे कोसळणार पाऊस?

आयएमडीच्या अंदाजानुसार, आज दक्षिण कोकणातील अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगर आणि पुणे जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होऊ शकतो. ठाणे, पालघर, रायगड या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. मराठवाडा तसेच विदर्भात पुढील ७२ तासांत धुव्वाधार पाऊस होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT