Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकीसाठी कोणती रणनीती आखणार? पवारांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक

NCP Meeting In Pune: आगामी निवडणुका लक्षात घेता या बैठकीत रणनीती आखली जाणार आहे.

Ruchika Jadhav

Pune News: राज्यात आगामी लोकसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांची जोरदार चर्चा सुरु आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अशात उद्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता या बैठकीत रणनीती आखली जाणार आहे.

शरद पवारांची उपस्थिती

आगामी महापालिका निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. उद्या पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थितीत राहणार असून सकाळी 10.30 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीत महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती

सोमवारी होणाऱ्या बैठकीत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे हे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थितांना शरद पवार स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उद्याची बैठक महत्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने नेमक्या किती जागा लढवायच्या यावर उद्या चर्चा होऊ शकते.

लोकसभेच्या २ रिक्त जागांवर लवकरच पोटनिवडणूक

पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच चंद्रपूर लोकसभेची पोटनिवडणूक झाल्यास तयारी म्हणून राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवलं आहे.

राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवडणूक जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेता निवडणुकीसाठी लागणारे साहित्य पुरवण्यात येणार असल्याची माहिती पत्रात दिली आहे. या पत्रात ज्या साहित्याची गरज आहे, त्याचा तात्काळ आढावा घेऊन मागणी करण्याची सूचना आहे.

चंद्रपूरचे खासदार बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांचा 30 मे रोजी झाला मृत्यू होता. त्यामुळे रिक्त झालेल्या चंद्रपूर लोकसभा आणि पुणे लोकसभा मतदारसंघासोबतच निवडणूक घ्यायची झाल्यास आयोगाने त्यासाठी तयारी केल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Box Office Collection: कांताराची दिवाळीत बंपर कमाई; लवकरच पार करणार ६०० कोटींचा टप्पा

Sachin Pilgaonkar : महागुरू सचिनचा नवा दावा, माझं गाणं 'त्यांनी' ऐकलं अन् अखेरचा श्वास घेतला

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Sai Tamhankar Photos: खोल गळ्याच्या ब्लाऊजमध्ये सईचं खुललं सौंदर्य, फोटो तुम्हालाही आवडतील

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT