IMD warned of heavy rain in several districts of Maharashtra kerla delhi haryana Konkan Madhya Maharashtra weather updates Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: स्वेटर नाही, रेनकोट बाहेर काढा; राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना झोडपणार

Weather Updates in Maharashtra: हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Satish Daud

IMD Weather Updates in Maharashtra

देशातून मान्सून पूर्णत: परतला असून अनेक राज्यांमध्ये थंडीची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसून येत आहेत. दुसरीकडे खरीप हंगामातील पिके काढणीला आली आल्याने शेतीकामाला वेग आला आहे. अशातच हवामान खात्याने देशासह राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऐन रब्बी हंगामात राज्यात पावसाचा इशारा (Rain Alert) देण्यात आल्याने शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, कोकणसह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज हलका ते मुसळधार पाऊस होईल. याशिवाय काही जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहिल.

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Weather Updates) आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात सकाळी गुलाबी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका असं हवामान पाहायला मिळत आहे. दुसरीकडे मुंबई, पुण्यासह ठाण्यातील तापमानात वाढ कायम आहे. पुण्यात सकाळी गारवा, तर दुपारी उन्हाच्या झळा बसत आहेत.

तर मुंबईतील तापमानाचा पारा वाढला असून वायू प्रदूषण आणि धुके यांनीही आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. मुंबईपेक्षाही उपनगरांमधील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत आहे. मुंबई आणि उपनगरातील शहरांमध्ये पीएम १० ची मात्रा अधिक आहे, यासाठी रस्त्यांवर धूळ, सुरु असणारे बांधकाम, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण जबाबदार आहे.

केरळमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

दरम्यान, महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केरळमधील मलप्पुरम, इडुक्की आणि पठानमथिट्टा जिल्ह्यांमध्ये आज म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT