महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज.
१३ जिल्ह्यांना ऑरेंज, तर उर्वरित भागाला यलो अलर्ट.
विदर्भ, कोकण, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.
Maharashtra IMD weather forecast for next 5 days : राज्यात आजपासून जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मागील काही दिवसांत पावसाने उघडीप घेतली होती. काही ठिकाणी उन्हाचे चटके जाणवायला लागले होते, तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस कोसळत होता. पण आता पुढील पाच दिवस राज्यात धो धो पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. १३ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट या काळात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यात विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार फक्त उत्तर महाराष्ट्रात पावसाचा कमी अंदाज आहे. (Orange alert in 13 districts of Maharashtra till August 18)
आजपासून राज्यात पुन्हा मान्सून वेगाने सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस, म्हणजे १८ ऑगस्टपर्यंत राज्यातील १३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर तर उत्तर महाराष्ट्र वगळता उर्वरित भागाला पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दुसरीकडे देशात पुढील सात दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे.( Maharashtra rain alert issued by IMD for August 13 to 18)
मान्सून हिमालयाच्या पायथ्याशी स्थिर झाल्याने मोठा पाऊस
मान्सूनचा ट्रफ सध्या पूर्व हिमालयाच्या पायथ्याशी
बंगालच्या उपसागरात मध्य भागात हवेचे चक्राकार अभिसरण
काश्मीरमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय
पश्चिम मध्य,वायव्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र
आगामी 48 तासांत ते अधिक तीव्र होण्याची शक्यता
कोकण, मराठवाड्यासह विदर्भात आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याशिवाय मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा जोर असेल. भंडारा, गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.