Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यावर पावसाचं सावट कायम, पुढचे ४ दिवस महत्वाचे; आज २० जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Weather : महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पावसाचं सावट निर्माण झालं आहे. हवामान विभागाने मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. उकाड्यात थोडासा दिलासा मिळत असला तरी सणासुदीच्या काळात पावसामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले आहेत.

Alisha Khedekar

राज्यात उकाडा कायम असतानाच पावसाची उघडीप

हवामान विभागाने मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला

ऐन दिवाळीत पावसाचं सावट असल्याने नागरिकांमध्ये नाराजी

पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता

राज्यात उकाड्याचा ताप कायम असताना पावसाची उघडीपही सुरु आहे. हवामान विभागाने आज मुंबईसह २० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने ऐन दिवाळीत पावसाचं सावट आहे. काल मुंबईतील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर कोकणातही पावसाने काल दमदार बॅटिंग केल्याचं पाहिला मिळालं.

महाराष्ट्रात उन्हाच्या तीव्रतेने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांना तापदायक ठरत आहे. ढगाळ हवामान आणि पावसाने हजेरी लावलेल्या भागात उन्हाचा चटका कमी होता. किमान तापमानात घट होऊ लागल्याने पहाटे गारवा वाढू लागला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सांताक्रुझ येथे ३५ अंश सेल्सिअस, ‎‎रत्नागिरी, ‎ब्रह्मपुरी येथे ३५ अंशांपेक्षा अधिक, तर अकोला, जळगाव, अमरावती, डहाणू येथे ३४ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

सलग दोन दिवस पावसाने संद्याकाळच्या सुमारास हजेरी लावली आहे. पुढील काही दिवस मुंबई, ठाणे, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी, रायगड,सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, वाशीम,अकोला या जिल्ह्यांना हवामान खात्याने पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून तीव्र उकाडा असलेल्या जिल्ह्यांना तुरळक प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र ऐन सणासुदीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कायद्याच्या राज्यात धावत्या बसमध्ये दरोडे; प्रवाशांची लूटमार कधी थांबणार?

मोठी बातमी: ५०० खोक्यांवर विधान करणं काँग्रेस महिला नेत्याला भोवलं! नवज्योत कौर सिद्धूचं थेट निलंबन

IndiGo हाजिर हो! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स

खूशखबर! नवी मुंबईला मिळणार आणखी एक मेट्रो; कुठून कुठे धावणार ? जाणून घ्या

IAS Transfer: राज्यातील १३ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या, नवं सरकार येताच बिहारमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल

SCROLL FOR NEXT