Maharashtra Weather Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाची रिमझिम सुरूच! कोकणासह 'या' जिल्ह्यांना पाऊस झोडपणार

Maharashtra Weather : महाराष्ट्रातून मॉन्सून माघारी गेला असून अजूनही काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. कोकण, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून येलो अलर्ट जारी केला आहे.

Alisha Khedekar

  • कोकणासह घाटमाथ्यावर आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे

  • हवामान खात्याने या भागांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे

  • ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ३६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले आहे

  • उर्वरित राज्यात उकाडा आणि उन्हाचा चटका कायम राहणार आहे

मॉन्सून राज्यातून तडीपार झाला असला तरी काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरु असलेली पाहायला मिळत आहे. आज कोकणात सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने येलो अलर्ट वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा तर उर्वरित राज्यात उन्हाची झळ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात थोड्या अधिक प्रमाणावर ढगाळ हवामान, उन्हाची झळ आणि उकाडा अनुभवायला मिळत आहे. कमाल तापमानाचा पारा सातत्याने ३२ अंशांपार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना उन्हाचे चटके नागरिकांना सोसावे लागत आहेत. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३६.५ अंश सेल्सिअस, ‎सांताक्रूझ, ‎जळगाव, रत्नागिरी, अमरावती येथे ३५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली.

पावसाला पोषक हवामान झाल्याने शुक्रवारी सकाळपर्यंत कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, मुंबई शहर, नाशिक आणि बीड जिल्ह्यांत रिमझिम पावसाच्या सरी पडल्या. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे सर्वाधिक ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

आज कोकणासह घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ढगाळ हवामान, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहून, राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.दरम्यान पुढील काही असचं वातावरण राहणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mulyachi Bhaji Recipe : हिवाळ्यात आवर्जून बनवा गावाकडे बनवतात 'तशी' मुळ्याची भाजी, वाचा खास रेसिपी

Maharashtra Live News Update: नवले पुलाजवळील पुन्हा अपघात

Maharashtra Weather : महाराष्ट्र गारठला! धुळे ५.४ अंशावर, पुढील ४ दिवस पारा आणखी घसरणार

Shukra Nakshatra Gochar: उद्या शुक्र करणार नक्षत्र परिवर्तन, या राशी जगणार ऐशो आरामात आयुष्य

Nagpur : उपराजधानी नागपुरात घातपाताची शक्यता, जैशकडून धमकी, १० हजार पोलीस तैनात

SCROLL FOR NEXT