Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?

Vande Bharat Express : भारतीय रेल्वेचा नवा टप्पा! रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ४.० ची घोषणा केली आहे. ही ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक वेगवान, आरामदायी आणि आधुनिक डिझाइनसह प्रवाशांना नवा अनुभव देणार आहे.
Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?
Vande Bharat ExpressSaam Tv
Published On
Summary
  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ४.० सुरू होणार असल्याची घोषणा केली

  • नवी ट्रेन पूर्वीपेक्षा अधिक वेगवान आणि आरामदायी असणार आहे

  • सुधारित तंत्रज्ञानामुळे ट्रेनचा वेग आणि परफॉर्मन्स दोन्ही वाढणार

  • भारतीय रेल्वे २०४७ पर्यंत उच्च वेगाच्या गाड्यांसाठी कॉरिडॉर विकसित करणार आहे

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुढील काही महिन्यांमध्ये वंदे भारत ४.० सुरु होणार असल्याची घोषणा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी केली. तर ही वंदे भारत ४.० आधीच्या ३.० पेक्षा अधिक जलद गतीने तसेच आरामदायी ठरणार असल्याचं रेल्वे मंत्री यांनी म्हटले आहे. या घोषणेनंतर प्रवाशांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील भारत मंडपम येथे १६ व्या आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ४. ० ची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय रेल्वे उपकरण हे तीन दिवसांचे प्रदर्शन आशियातील सर्वात मोठे आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे प्रदर्शन आहे.

Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?
Maharashtra Rain Alert : दिवाळीत पावसाचा धुमाकूळ! कोकण-मराठवाडा अन् विदर्भाला झोडपणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

१५ हून अधिक देशांमधील ४०० हून अधिक कंपन्या त्यांची उत्पादने प्रदर्शित करत आहेत. या कंपन्यांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, झेक प्रजासत्ताक, चीन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, नेदरलँड्स, रशिया, स्वित्झर्लंड, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि युनायटेड स्टेट्समधील कंपन्यांचा समावेश आहे.

Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?
Kokan Rain Alert : कोकणात पावसाची दमदार बॅटिंग, हवामान खात्याचा यलो अलर्ट; पुढील दोन दिवस वातावरण कसं राहील?

रेल्वे मंत्री म्हणाले की, नवी वंदे भारत ४.० ही सर्वात वेगवान आहे. त्यांनी स्पष्ट केले की वंदे भारत ३.० सध्या ५२ सेकंदात शून्य ते १०० किलोमीटर प्रति तास वेग वाढवते, जे जपान आणि युरोपमधील काही गाड्यांपेक्षा जास्त आहे. त्यांनी स्पष्ट केले की वंदे भारत ४.० मध्ये ही क्षमता अजून जास्त असेल. सुधारित मोटर तंत्रज्ञान आणि हलक्या डिझाइनमुळे ट्रेन आणखी कमी वेळेत जास्त वेग गाठू शकेल.

Vande Bharat 4.0 : रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा! लवकरच सुरु होणार वंदे भारत ४.०, कसा असणार प्लॅन?
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही जिल्ह्यांना यल्लो अलर्ट, जाणून घ्या कुठे कसा पडणार पाऊस

ही ट्रेन अधिक वेगवान असणार आहे. शिवाय या ट्रेन मधील आसनाची सेवा वाढवण्यात आली आहे. कोचची कामगिरी इतर ट्रेनपेक्षा अधिक सुधारित केली गेली आहे. आराम, सुरक्षितता आणि डिझाइनमध्येही सुधारणा असतील. दरम्यान रेल्वेमंत्र्यांनी असेही सांगितले की भारतीय रेल्वे २०४७ पर्यंत ७,००० किलोमीटर लांबीचे कॉरिडॉर विकसित करण्याच्या योजनेवर काम करत आहे. या कॉरिडॉरवरील गाड्या ताशी ३५० किमी वेगाने धावू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com