Ditwah Cyclone Update Saam Tv
महाराष्ट्र

Ditwah Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठला! तापमानाचा पारा घसरला, दितवा चक्रीवादळाचा फटका राज्याला?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. दितवा चक्रीवादळ तमिळनाडू, आंध्र प्रदेश व पुडुचेरी किनाऱ्यावर धडकणार असल्याने मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Alisha Khedekar

  • महाराष्ट्र पुन्हा गारठला

  • राज्याच्या तापमानात घसरण

  • बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ उत्तर तमिळनाडू-दक्षिण किनारपट्टी, आंध्र प्रदेशात धडकणार

  • काही जिल्ह्यांना रेड अलर्ट

बंगालच्या उपसागरात खवळलेलं दितवाह वादळ आज उत्तर तमिळनाडू-दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशात धडकणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. याचा परिणाम भारतात होणार आहे. महाराष्ट्रात या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदल पाहयला मिळतो आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात वातावरण ढगाळ असल्याकारणाने उकाडा वाढला होता. मात्र आज पासून पुन्हा तापमानाचा पारा घसरला असून कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.

राज्यात मुंबई, पुणे, जळगाव, निफाड, नाशिक, नागपूर, सोलापूर या ठिकाणी काही अंशी तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यांमध्ये गुलाबी थंडीची चादर पसरली आहे. काल म्हणजेच शनिवारी विदर्भातील भंडारा येथे राज्याचे नीचांकी १० अंश तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली असून, किमान तापमानात घसरण झाल्याने थंडी कमी झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दितवा चक्रीवादळ (Ditwah Cyclone) भारतीय किनाऱ्याकडे सरकत असल्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये आणखी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या प्रदेशांसाठी रेड अलर्ट देखील जारी केला आहे.

राज्याचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन म्हणाले की, चक्रीवादळ चेन्नईजवळील किनाऱ्यावर धडकेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु राज्य सरकार युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू करण्यास पूर्णपणे सज्ज आहे.आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा म्हणाले की, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीभोवती समुद्री वारे ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वाहत आहेत, जे आता ९० किमी/ताशी वेगाने वाहत आहेत. तसेच या चक्रीवादळाचे परिणाम आज संध्याकाळ पर्यंत जाणवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सदा मामा पाटील यांची निवड

Makeup Tips: ब्लश, ब्रॉन्झर आणि हायलाइटरमध्ये नेमका फरक काय?

Solapur Politics: मोठी बातमी! सोलापुरात भाजपकडून अजित पवारांना धक्का, मतदानाआधीच राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार फोडला

Makar Sankranti : मकर संक्रांतीला चंद्रासारखे खुलेल रूप, चमकदार अन् मऊ त्वचेसाठी 'गाजर'चा असा करा वापर

मी मुंबईत येणारच, हिंमत असेल तर पाय कापून दाखवा, के आन्नामलाई यांचे राज ठाकरेंना आव्हान

SCROLL FOR NEXT