Maharashtra Weather Update Saam Tv
महाराष्ट्र

Heavy Rain Alert : महाराष्ट्रावर पावसाचं सावट? मुंबई-पुण्यात तापमानाचा पारा घसरला; गुलाबी थंडी कधीपासून? वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात तापमानात सतत चढ-उतार सुरू असून दिवसा उकाडा आणि रात्री थंडी जाणवत आहे. ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे ढगाळ वातावरण आणि तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १ डिसेंबरपासून पुन्हा गारठा वाढणार आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात तापमानात चढ-उतार कायम

  • दक्षिण भागात रिमझिम पावसाची शक्यता

  • १ डिसेंबरपासून पुन्हा गुलाबी थंडी

  • बदलत्या हवामानामुळे नागरिक हैराण

महाराष्ट्राच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. पहाटे थंडी आणि दुपारी उन्हाचा उकाडा अशी स्थिती आहे. बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या ‘डिटवाह’ चक्रीवादळामुळे आज राज्यात आकाश ढगाळ असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबई, पुण्यामध्ये काही अंशी तापमानाचा पारा घसरला आहे.

बंगालच्या उपसागरात घोंगावणारं ‘डिटवाह’ चक्रीवादळ उद्या म्हणजेच ३० नोव्हेंबर रोजी पहाटेपर्यंत उत्तर तमिळनाडू-दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात रात्रीच्या तापमानात आज आणि उद्या पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाचे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटले आहे.

काल म्हणजेच शुक्रवारी विदर्भातील भंडारा येथे राज्याचे नीचांकी १० अंश तापमान नोंदले गेले. राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान १४ अंशांच्या वर असून, किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. राज्यात कमाल तापमानाचा पारा अद्यापही तिशीपार असून, कोकणातील डहाणू येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

राज्यात १ डिसेंबर पासून वातावरण पूर्ववत होऊन गुलाबी थंडी पुन्हा पडणार आहे. पुढील तीन दिवसात २ ते ३ अंश सेल्सियस ने तापमानात घट होणार आहे. त्यामुळे वातावरणात गारवा वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत बदलत असलेल्या वातावरणाने नागरिकांना हैराण केले असून वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT