Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या

Pune Gajanan Marne News : पुण्यातील आयटी अभियंता मारहाण प्रकरणात अटक झालेल्या कुख्यात गुंड गजानन मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या
Pune NewsSaam Tv
Published On
Summary
  • कुख्यात गुंड गजानन मारणे याला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर

  • आयटी अभियंता मारहाण प्रकरणात २४ फेब्रुवारीला अटक

  • नागरिकांमध्ये संतापाची भावना

  • गुन्हेगारी नियंत्रणावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अक्षय बडवे, पुणे

पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. मोक्का आरोपी कुख्यात गुंड गजानन मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. एका आयटी अभियंता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी गजानन मारणेला २४ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गजानन मारणे आणि इतर सदस्यांवर मोक्का लावला होता, मात्र त्यांना आता जामीन मंजूर झाल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील आयटी अभियंता तरुण १९ फेब्रुवारी रोजी दुपारी दुचाकीवरून घरी निघाला होता. वाटेत भेलकेनगर परिसरात रस्त्यावर गर्दी होती. या गर्दीतून दुचाकी काढण्याचा प्रयत्न करताना तिघांनी त्या तरुणाला बेदम मारहाण केली. याबाबत अभियंता तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या
Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

त्यानुसार पोलिसांनी ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय-३५), किरण कोंडिबा पडवळ (वय-३१) अमोल विनायक तापकीर (वय-३५, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) या तिघांना अटक केली होती. या गुन्ह्यातील अन्य एक आरोपी श्रीकांत संभाजी पवार पसार झाला होता. तपासात आरोपी मारणे टोळीशी संबंधित असल्याचे समोर आले.

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या
Kalyan : संतापजनक! शिवीगाळ केली, धमकी दिली, कारागृहात कैद्याचा हवालदारावर जीवघेणा हल्ला

या घटनेनंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ‘पुणे पोलिसांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. पोलिस डोळे बंद करून बसले आहेत का?’ या भाषेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींसह टोळीप्रमुख गजानन मारणे, त्याचा भाचा रूपेश मारणे याच्यावर मकोका कायद्यान्वये कारवाई केली.

Pune : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेला जामीन; नेमकं काय प्रकरण? जाणून घ्या
Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

मात्र आता या खटल्यात अनपेक्षित वळण आले आहे. तक्रारदार असलेले देवेंद्र जोग स्वतः विशेष मोक्का न्यायालयात हजर झाले आणि त्यांनी महत्त्वाचे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी नमूद केले की, त्यांना कोणीही मारहाणीसाठी चिथावणी दिली नव्हती आणि आता त्यांना आरोपींविरुद्ध कोणतीही तक्रार नाही. या प्रतिज्ञापत्राच्या आधारे गजानन मारणेच्या वकिलांनी जामीन अर्ज दाखल केला होता, आणि न्यायालयाने तो मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com