कल्याण कारागृहात कैद्याचा हवालदारावर हल्ला
गप्पा मारण्यास मनाई केल्याने आरोपीचा राग अनावर
हवालदार जखमी; खडकपाडा पोलीसात गुन्हा नोंद
या घटनेमुळे कारागृहातील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह
संघर्ष गांगुर्डे, कल्याण
कल्याणमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातील कारागृहातील एका गुन्ह्याच्या प्रकरणात बंदिस्त असलेल्या आरोपींनी पोलीस ठाण्याच्या हवालदारावर हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित हवालदार गंभीर जखमी झाले. संतापजनक म्हणजे या आरोपींना एकमेकांसोबत गप्पा मारू न दिल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे उघड झाले आहे. हवालदार प्रभू चव्हाण असे जखमींचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हितेंद्र उर्फ हितेन गुलीवर ठाकूर हा एका गुन्ह्याच्या प्रकरणात कल्याणमधील आधारवाडी कारागृहात बंदी आहे. याच कारागृहात प्रभू चव्हाण हे हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी साडे चार वाजताच्या सुमारास कारागृहात सर्कल सहा येथे हवालदार प्रभू ऑन ड्युटी होते. यादरम्यान प्रभू यांच्याजवळ आरोपी ठाकूर याने त्याच कारागृहात बंदी असलेल्या त्याचा साथीदार सुनीलसिंग धारासिंग लबाना याला गप्पा मारण्यासाठी माझ्या इथे पाठवा अशी मागणी केली.
हा प्रकार नियमबाह्य आणि गैरवर्तणुकीचा असल्याने हवालदार चव्हाण यांनी हितेंद्र ठाकूर याला मनाई केली. आरोपी सुनीलसिंगला हितेंद्रकडे गप्पा मारण्यासाठी हवालदाराने सोडले नाही. याचा राग आरोपी हितेंद्र ठाकूर याला आला. त्याने हवालदार चव्हाण यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली, त्यांना दमदाटी करून धमकी देखील दिली. संतापलेल्या हितेंद्र ठाकूरला हवालदार चव्हाणांनी शांत राहण्याचा सल्ला दिला.
पण हितेंद्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याने रागाच्या भरात बाजुलाच पडलेला दगड आणि सिमेंटचा तुकडे उचलत चक्क हवालदार चव्हाण यांच्या दिशेने फिरकावला. यावेळी झालेल्या झटापटीत हवालदार प्रभू चव्हाण किरकोळ जखमी झाले. त्यांनी या प्रकरणी आरोपी ठाकूर विरोधात शासकीय कामात अडथळा आणला, तसेच आपणास दमदाटी, शिवीगाळ केली म्हणून खडकपाडा पोलीस ठाण्यात पुन्हा गुन्हा दाखल केला. खडकपाडा पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.