Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११ कोटींची लूट टळली

Palghar Jawhar News : जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील अनामत निधीवर डल्ला मारण्याचा १११ कोटी रुपयांचा प्रयत्न SBI अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने उधळला. फर्जी चेक व स्वाक्षरी प्रकरणी तपास सुरू असून विभागीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याची शक्यता.
Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११  कोटींची लूट टळली
Palghar NewsSaam Tv
Published On
Summary
  • SBI अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार ओळखून १११ कोटी रुपयांचे नुकसान टाळले

  • बनावट स्वाक्षरी व कागदपत्रांचा संशय

  • PWD विभागीय कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता

  • प्रकरणी चौकशी सुरू

जव्हार मधून मोठी बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार शाखेच्या अधिकाऱ्याला संशय आल्याने गैरमार्गाने विभागाच्या खात्यात पडलेल्या कोट्यावधी रुपयांचा निधी लाटण्याचा प्रकार टळला. या प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत चौकशी करत असून यामध्ये काही विभागीय कर्मचारी अधिकारी यांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत दरवर्षी कोट्यावधी रुपयांची काम केली जातात. काम देताना ठेकेदारांकडून अनामत रक्कम जमा करून घेण्यात येते. ही रक्कम कामाच्या एक ते दोन टक्का सर्वसाधारणपणे असून काही विशिष्ट कामांमध्ये ही अनामत रक्कम ही पाच टक्क्यांपर्यंत जमा करून घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे.

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११  कोटींची लूट टळली
Shocking : 'मला पाहिजे ते तुम्ही द्या...' शिक्षकाकडून ४ अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ, नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांकडून विकास कामे झाल्यानंतर अनामत रक्कम पुन्हा घेण्यास ठेकेदारांमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे निरुत्साह असतो. त्यामुळे याकरिता असणाऱ्या बँक खात्यामध्ये जमा होणाऱ्या अनामत रक्कम व त्यावरील व्याज मोठ्या प्रमाणात जमा झाल्याची अंतर्गत माहिती प्राप्त झाली.

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११  कोटींची लूट टळली
Shocking : संतापजनक ! पैशांसाठी आई मला शेजाऱ्याकडं पाठवायची; दहावीतील विद्यार्थिनीचा शिक्षिकेकडे धक्कादायक खुलासा

पालघर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार सुरू असताना जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका कर्मचाऱ्यांने १११ कोटी ६३ लक्ष रुपयांचा डिमांड ड्राफ्ट (DD) काढण्यासाठी चेक व आवश्यक स्लिप जव्हारच्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जमा केली. संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या रकमेचा डिमांड ड्राफ्ट काढण्याच्या या प्रयासामुळे त्यांच्या मनात पाल चुकचुकली.

Bank Fraud Alert : PWD घोटाळ्याचा पर्दाफाश! SBI अधिकाऱ्याच्या सतर्कतेने १११  कोटींची लूट टळली
Cyclone Alert : महाराष्ट्र पुन्हा गारठणार! चक्रीवादळामुळे बदलतंय हवामान, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

त्यांनी या डिमांड ड्राफ्टसाठी देण्यात आलेल्या चेकच्या स्वाक्षऱ्या, इतर बाबी तपासणी आणि पडताळणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष भेट दिली. कार्यालयात उपस्थित असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपण हा चेक दिला नसल्याची भूमिका घेत, देण्यात आलेल्या चेकचा तपशील दिल्यास अथवा चेक दिल्यास यासंदर्भात तपास करून पुढील कारवाई करू असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com