Maharashtra Winter Saam Tv
महाराष्ट्र

Winter Alert : महाराष्ट्र गारठला! तापमानाचा पारा १० अंशाखाली, मुंबई- पुण्यासह १५ जिल्ह्यात नागरिकांना भरली हुडहुडी

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे तापमान १० अंशांखाली घसरले आहे. धुळे येथे ६.१ अंशांची नोंद झाली. पुण्यात सलग तीन दिवस तापमान १० अंशांखाली राहिले. पुढील काही दिवसांत थंडी कमी होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

Alisha Khedekar

राज्यातील तापमान १० अंशांच्या खाली घसरून थंडीची लाट कायम

धुळे येथे हंगामातील ६.१ अंश सेल्सिअसची नीचांकी नोंद

पुण्यात सलग तीन दिवस १० अंशांखाली तापमान

पुढील काही दिवसांत उत्तरेकडील वारे कमकुवत होऊन थंडी कमी होण्याची शक्यता.

राज्यात उत्तरेकडील शीत वारे सुरूच असल्याने तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली घसरला आहे. धुळे येथे हंगामातील नीचांकी ६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज राज्यातील थंडीची लाट काहीशी ओसरणार असली तरी राज्यात हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सर्वाधिक किमान तापमानाची नोंद जळगाव मध्ये झाली आहे.

राज्यात किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरल्याने गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ३ ते ९ अंशांची मोठी घट नोंदवली गेली आहे. पहाटे जाणवणारी हुडहुडी दुपारी कमी होत असली तरी, सायंकाळ होताच थंडीचा पुन्हा कडाका वाढत आहे. कमाल तापमानात चढ-उतार सुरूच असून, निवडक ठिकाणी पारा अद्यापही ३० अंश पार आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

जळगाव जिल्ह्यातील पारा ७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला असून आज ८.१ डिग्री सेल्सिअसवर आहे. आता उत्तरेत बर्फदृष्टी बऱ्याच प्रमाणात थांबलेली आहे. त्यामुळे शीतलहरींची निर्मिती हळूहळू घटत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत गारठा कमी होण्याचे संकेत मिळत आहेत.उत्तर-पश्चिमी वाऱ्यांमुळे थंडी वाढली होती; मात्र २० नोव्हेंबरपासून हे वारे कमकुवत होणार असून, दक्षिणेकडून येणाऱ्या उष्ण, कोरड्या हवेचा प्रभाव वाढत आहे. हे हवेच्या दाब प्रणालींमधील बदलांमुळे घडत आहे. ज्यामुळे थंड हवेचा प्रवाह मंदावतो. असे तज्ञांनी मत व्यक्त केले.

पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पुणेकर थंडीने गारठले आहेत. पुण्यातील पाषाण, हवेली येथे सलग तीन दिवस ९ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: धुरंधर रणवीर सिंग 'त्या' प्रकरणामुळे पुरता अडकला, मंदिर अन् कोर्टाची पायरी चढावीच लागणार, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पेट्रोल आणि डिझेल संपणार; या अफवांनी सांगलीतील पेट्रोल पंपांवर वाहनधारकांची झुंबड

Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

West Bengal Politics: ऐन निवडणुकीत ममता बॅनर्जींना मोठा धक्का; टीएमसीच्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Chapati Vastu Tips: चपात्या मोजून बनवता? वास्तुशास्त्रानुसार यामुळे घरात येऊ शकते नकारात्मक ऊर्जा

SCROLL FOR NEXT