Maharashtra Weather Update Saam tv
महाराष्ट्र

Winter Alert : महाराष्ट्रात कडाक्याची थंडी! तापमान ११ अंशांच्या खाली, 'या' जिल्ह्यांना हुडहुडी

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कडाक्याची थंडी कायम आहे. तापमानात ७ अंशांपर्यंत घट झाल्याने राज्यभर गारठा वाढला आहे. धुळे, नाशिक, यवतमाळ येथे नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.

Alisha Khedekar

उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे वाहत असून थंडीची लाट कायम आहे

धुळे येथे ८.४ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली

राज्यात कोकणासह मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढला आहे

थंडीमुळे आरोग्याच्या समस्या वाढल्या

उत्तरेकडील शीत वारे राज्याच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ७ अंशांची मोठी घट झाल्याने कडाक्याची थंडी कायम राहणार आहे. आज वातावरण मुख्यतः कोरडे राहणार आहे. उत्तरेकडे थंडी कायम राहण्याची तर दक्षिणेकडे किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. महाराष्ट्रात मुंबई, यवतमाळ, नाशिक , जळगाव, पुणे, ठाणे, कोकणात धुक्यासह थंडीची हुडहुडी कायम आहे.

हवामान विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार, आज राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू घट होत आहे. काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ‎डहाणू येथे ३२.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालय येथे राज्याचे नीचांकी ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव, निफाड येथे थंडीची लाट कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकण, रत्नागिरी, नाशिक, परभणी, वाशिम, यवतमाळ या ठिकाणी गुलाबी थंडीची चादर पसरली आहे.

महाराष्ट्रातील तापमानाचा पारा १० अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आली असे समजले जाते. राज्यात गारठा वाढत असून, सकाळच्या सुमारास धुक्यासह दव पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज राज्याच्या किमान तापमानात घट होत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. सकाळच्या सुमारास थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका असल्याने नागरिकांना उन्हाची काहिली भलतीच ताप देत आहे.

वाशिममध्ये तापमान ११.८ अंशावर

वाशिम जिल्ह्यातील हवामानात बदल होत असून, मागील चार ते पाच दिवसांपासून अचानक थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाशिममध्ये किमान तापमान ११.८ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी लोकांनी शेकोट्यांचा आधार घेतल्याचं बघायला मिळाल. तापमानात सातत्याने घसरण होत असल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, तर या थंडीचा फायदा मात्र रब्बी पिकांसह तुरीच्या पिकाला होत असल्याने उत्पादन वाढ होण्याची शक्यता आहे.

यवतमाळमध्ये हुडहुडी वाढली

गेल्या चार दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात थंडीची लाट आली आहे. बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून अचानक थंडीत वाढ झाल्याने शहरीसह ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पारा ११ अंश सेल्सिअस वर आला आहे. आणखी काही दिवस थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेतीच्या वादातून नातेवाईकांत हाणामारी,एकाचा मृत्यू तर आठ जण जखमी

SSC Exam 2026: दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेसंदर्भात बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Child Eye Health: मुलांना चष्मा लागू नये वाटत असेल तर काय करावं? पालकांसाठी नेत्ररोग तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

Mumbai News : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील २२ तास या भागात पाणीपुरवठा राहणार बंद

Bank Fraud : ठाकरेंच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या, माजी खासदारावर गुन्हा दाखल, बँक फसवणूक प्रकरणात अटक होणार

SCROLL FOR NEXT