Maharashtra Winter Temperature Update  Saam tv
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात कडाक्याची थंडी, पुढील २४ तास महत्त्वाचे; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Today Weather Update News : पाकिस्तानकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. पुढील २४ तास तापमान कमी राहणार असून त्यानंतर वाढ होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

Alisha Khedekar

  • पाकिस्तानसह आजूबाजूच्या देशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी वाढली

  • मुंबई, पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांत तापमानात घसरण

  • पुढील २४ तास थंडी कायम, त्यानंतर तापमान वाढण्याची शक्यता

Maharashtra Winter Temperature Update पाकिस्तानसह आजूबाजूच्या देशातून भारताकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या लहरींमुळे भारतासह महाराष्ट्रात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. मुंबई, पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला असून पुढील २४ तास असेच तापमान कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र तापमानात वाढ होणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतातील ईशान्य मोसमी वाऱ्यांचा हंगाम संपल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. हवामान विभागानुसार, सोमवारी निफाड येथे ७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे ९.८ अंश सेल्सिअस आणि धुळे येथे १० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आज राज्यात थंडी कमी होऊन राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने गारठा कमी-अधिक होत आहे.

यवतमाळमध्ये नागरिकांना थंडीचा फटका

यवतमाळमध्ये वातावरणातील बदलामुळे सर्दी,खोकला,डोकेदुखी, अपचन यादी रुग्णांमध्ये कमालाची वाढ झाली आहे. यवतमाळात सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या संख्येमुळे हाउसफुल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत, तर सायंकाळी आणि सकाळी गारठा निर्माण होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : मेकअप न करताही मिळेल चेहऱ्यावर गुलाबी चमक, ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

Maharashtra Live News Update: संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला

Bihar Bhavan: मुंबईत उभारणार बिहार भवन; ३० मजली इमारत बांधणार, खर्च ३१४ कोटी; मनसेचा विरोध | VIDEO

Uddhav Thackeray : ऐन झेडपी निवडणुकीत शिंदेंचा ठाकरेंना झटका; बड्या नेत्यासह ३०० जणांनी सोडली साथ

Vitamin B Deficiency: सतत थकवा, चक्कर येतेय? Vitamin Bची असू शकते कमी, वेळीच ओळखा संपूर्ण लक्षणं

SCROLL FOR NEXT