Maharashtra Weather Update Saam tv
महाराष्ट्र

Weather Update : राज्यात थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला; राज्यात आज कुठे कसे हवामान?

Maharashtra Weather Update : राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली असून उकाडा जाणवू लागला आहे. काही जिल्ह्यांत हलक्या पावसाचा अंदाज असून उद्यापासून तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Alisha Khedekar

  • ढगाळ हवामानामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ झाली आहे

  • गारठा कमी झाल्याने अनेक भागांत उकाडा जाणवत आहे

  • काही जिल्ह्यांत हलक्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे

  • सतत बदलणाऱ्या हवामानाचा आरोग्य आणि शेतीवर परिणाम होत आहे

राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण झाल्याने राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. गारठा काहीसा कमी झाल्याने उकाडा जाणवू लागला आहे. आज राज्याच्या किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा, तर उद्यापासून किमान तापमानात पुन्हा हळूहळू घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार काल धुळे येथे ७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथे ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तसेच जळगाव, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ येथे ११ अंश व त्यापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.

आज राज्यात तापमानात वाढ होऊ लागल्याने उकाडा जाणवू लागला आहे. तसेच ढगाळ हवामान निर्माण झाल्याने पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उद्यापासून किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. सतत बदलत राहणाऱ्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शेतकऱ्यांच्या शेतपिकांवर देखील याचे गंभीर परिणाम होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: बोरीवलीत भाजप उमेदवाराने पैसे वाटले, मनसे-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी थेट VIDEO केला शेअर

Maharashtra Live News Update: मकर संक्रांतीनिमित्त नागपुरातील १५ उड्डाणपूल बंद

Bhandara : ८ दिवसांच्या मुलीला स्कूल बॅगमध्ये भरलं, नदीकाठावर फेकून दिलं; रडण्याचा आवज ऐकून गावकऱ्यांची धाव

Makar Sankranti Gift Ideas: लग्नानंतरची पहिली संक्रांत! नवऱ्याने बायकोला भेट द्या या 5 वस्तू, नात्यात येईल तिळगुळासारखा गोडवा

Colorectal Cancer Diet: खाण्यापिण्याच्या बदलामुळे होऊ शकतो 'आतड्याचा कॅन्सर', आत्ताच 'हे' पदार्थ खाणं सोडा

SCROLL FOR NEXT