IMD Rain Alert in marathwada vidarbha Maharashtra Many District Weather Update Saam TV
महाराष्ट्र

IMD Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस; मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांवर संकट

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

Satish Daud

IMD Rain Alert in Maharashtra

वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे थंडी गायब झाली असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सध्या काही राज्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. महाराष्ट्रावरही पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट ओढवलं आहे. शनिवारपासून पुढील ५ दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजनुसार, पुढील ५ दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याचा देखील अंदाज आहे. शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्लाही देण्यात आलाय.

मुंबईसह, पुण्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील किमान आणि कमाल तापमानात घट होईल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे. (Latest Marathi News)

सध्या डोंगराळ भागात पावसासह बर्फवृष्टी होत असून मैदानी भागात गारा पडत आहेत. काल म्हणजेच गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या गुलमर्गमध्येही हिमस्खलन झालंय. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड हवेचा जोर वाढला आहे. परिणामी पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांत थंडी वाढण्याची शक्यता आहे.

नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी जोर वाढेल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे महाराष्ट्र उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, चंडीगड, लडाख आणि राजस्थानमध्ये सलग ५ दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उल्हासनगरमध्ये कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग

Kalyan : इंग्लिश स्कूलचा अजब फतवा; कपाळावर टिळा, टिकली; हातात राखी बांधण्यावर बंदी

Painting: मराठी चित्रकाराचं 67 कोटींचं पेन्टिंग, असं काय दडलंय त्यामध्ये? वाचा सविस्तर...

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! eKYCच्या नावाखाली फेक वेबसाइट; नेमकं सत्य काय?

Mumbai News : बोरिवली स्टेशनवर फिल्मी स्टाईल दरोडा, ६ जणांनी लाखो रूपयांवर केला हात साफ

SCROLL FOR NEXT