Maharashtra Weather Update Saam TV
महाराष्ट्र

Weather Update: राज्यात पुढील ३-४ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? वाचा...

Maharashtra Rain Alert: हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Satish Daud

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता उत्तर पूर्व बंगाल खाडीकडे सरकला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, तर खरीप हंगामातील पिकांना मिळणारा हा मोठा दिलासा असेल.  (Latest Marathi News)

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळत आहेत. मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने पुनरागमन (Rain Updates) केलं आहे. शुक्रवारी मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. आता शनिवारी देखील राज्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने पुढील ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस

हवामान खात्याने (Weather Alert) दिलेल्या अंदाजानुसार राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. यापार्श्वभूमीवर विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना यलो अलर्ट

हवामान खात्याने शनिवारी बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांना जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता

याशिवाय मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूरमध्ये सतेज पाटलांना धक्का! ऋतुराज पाटील पराभवाच्या छायेत

Maharashtra Election Result: भाजपला १२०+ जागा मिळणार! निकालाआधीच भाजपच्या नेत्याचा दावा

Amla Pickle: आवळ्याचे लोणचे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे, जाणून घ्या कारणे...

Maharashtra Election Result : 'महायुतीचे सरकार बनण्यामागे लाडक्या बहिणींचा मोठा हात'

Sanjay Raut Press Conference : हा जनतेचा कौल नाही, हे निकाल अदानींनी लावून घेतलेत; संजय राऊत बरसले

SCROLL FOR NEXT