Truck Crushed Two Women Yandex
महाराष्ट्र

Buldhana Accident News: धक्कादायक! अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने २ पादचारी महिलांना चिरडलं

Rohini Gudaghe

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे ही वाहने भरधाव वेगात असल्याचं देखील समोर आलं आहे. अशाच एका अवैध (Buldhana Accident News) रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दोन पादचारी महिलांना चिरडल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दुसरी महिला गंभीर स्थितीमध्ये आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. तसंच वाहन चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

बुलढाणा मार्गावरील नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळ एका भरधाव ट्रकने दोन महिलांना चिरडलं. यामध्ये एका महिलेचा अपघात स्थळीच मृत्यू झाला आहे. तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली (Truck Crushed Two Women) आहे. जखमी महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आठवडाभरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे अपघात घडून जिल्ह्यात चार जण ठार झाले आहेत. नांदुरा - बुलढाणा मार्गावरील नांदुरा शहरातील कब्रस्तान जवळील आज सकाळी (Accident News) देखील भीषण अपघात झाला आहे. या अपघातानंतर घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यानंतर काही वेळाने नांदुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

या अपघातामध्ये मृत महिलेचं नाव वनिता बोचरे, असं आहे. तर जखमी महिलेचं नाव गीता ढगे असल्याची माहिती मिळतेय. ढगे या गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. जिल्ह्यामध्ये अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढली (Buldhana News) आहे. तसंच वाळू माफियांची दहशत देखील दिसून येत आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT