illegal sand mining in tumsar near bhandara saam tv
महाराष्ट्र

Bhandara : तुमसरमध्ये राजसाेसपणे बेकायदेशीर मुरुमाचे उत्खनन, महसूल विभाग कारवाईचे धाडस दाखविणार का ?

महसूल विभागाने तातडीने लक्ष देणे आवश्यक बनले आहे.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News :

भंडारा (bhandara latest marathi news) जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन बांधकाम सुरु आहेत. रस्ते, घरे, इतर बांधकाम करीता माती, मुरुमाची गरज भासते. परंतु भू- माफिया, कंत्राटदार हे महसूल विभागाची कुठलीही परवानगी न घेता बिनधास्त माती, मुरुमाचे उत्खनन करीत आहेत. हा प्रकार तुमसर (tumsar) तालुक्यात मुख्यत्व दिसून येत आहे. (Maharashtra News)

खापा हद्दीत राईस मील बांधकाम करीता हजारो ब्रास माती, मुरूम लागतं असुन कंत्रादारांकडून महसूल विभागाची कुठलीही रॉयल्टी काढण्यात आली नाही. तरी येथे बिनधास्तपणे उत्खनन सुरु आहे. हा सर्व प्रकार भंडारा तुमसर महामार्ग जवळचं होत असुन तहसीलदार याच मार्गाने जाणे येणे करीत असताना त्यांना हा प्रकार लक्षात का आला नाही का असा सवाल उपस्थीत केला जात आहे.

तहसील कार्यालय पासुन अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर उत्खानन सुरू आहे. या बराेबरच तालुक्यांत अनेक ठिकाणी अवैध उत्खनन सुरु असून महसूल विभागाचा कोट्यवधीचा महसूल बूडत आहे. त्यामुळे महसुल विभागाच्या अधिकारी यांनी तातडीने अवैध उत्खन्न राेखण्यासाठी ठाेस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

Yuzvendra Chahal: भारतीय खेळाडू युजवेंद्र चहलची तब्येत बिघडली; २ गंभीर आजारांची झालीये लागण

Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ; आधी ४२०ची केस आता घर आणि रेस्टॉरंटवर इनकम टॅक्सचा छापा, पण...

SCROLL FOR NEXT