हिवाळा म्हटलं की सर्व जण महाबळेश्वरला जाऊन लाल, केशरी चुटुक स्ट्रॉबेरी (strawberry) खाण्यासाठी जात असतात. पण आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी थेट खेडच्या चिंबळी या गावात बघायला मिळणार आहे. चिंबळीच्या प्रगतीशील शेतकरी सीमा जाधव (strawberry grower seema jadhav) यांनी प्रयाेग करुन स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे. त्यातून त्यांना उत्तम उत्पन्न मिळू लागले आहे. (Maharashtra News)
सीमा जाधव आणि चंद्रकांत जाधव हे शेतावर नवनवीन शेतीत प्रयोग करत असतात. आपल्या दहा गुंठे क्षेत्रावर महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरी नाभिला जातीची पाच हजार रोपे आणून त्याची लागवड त्यांनी केली.
सर्व शेती त्या सेंद्रिय पद्धतीने करतात. ठिबक सिंचन आणि मलचींग पेपरचा वापर करून सहा ऑक्टोबरला त्यांनी स्ट्राॅबेरीची लागवड केली होती. डिसेंबरच्या पंधरवड्यावर स्ट्रॉबेरी फळांची काढणी ही चालू करण्यात आली.
शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री लाल चुटुकदार स्ट्रॉबेरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या सोसायटीमध्ये विकली जाऊ लागली आहे. केवळ विकली जात नसून सेंद्रिय स्ट्रॉबेरीला प्रति किलोला चारशे रुपये भाव मिळू लागला आहे. साधारण अडीच हजार किलो स्ट्रॉबेरी फळे या शेतीतून उत्पन्न मिळण्याचा अपेक्षा जाधव कुटुंबियांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
सीम आणि चंद्रकांत जाधव म्हणाले सुरवातीला एक लाख रुपये खर्च करून दहा गुंठेवर हे स्ट्रॉबेरीचं पीक घेण्याचा धाडसी निर्णय आम्ही घेतला. रोपे,ठिबक संच,मालचींग पेपर आणि बेड बनविणे याचा खर्च एक लाख वजा जाता नऊ लाखाचे निव्वळ फायदा हाेईल असे वाटते.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.