MLA Santosh Bangar Challenge Saam Digital
महाराष्ट्र

MLA Santosh Bangar Challenge: नरेंद्र मोदी पुन्हा PM झाले नाहीत तर भर चौकात आत्महत्या करेन, आमदार संतोष बांगर यांनी दिलं चॅलेंज

MLA Santosh Bangar Challenge: शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार बांगर यांनी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीत तर भर चौकात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा पण त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

MLA Santosh Bangar Challenge

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदें यांच्या शिवसेना पक्षाचे असल्याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे हिंगोली कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार बांगर यांनी 2024 मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले नाहीत तर भर चौकात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा पण त्यांनी केला आहे.

शिवसेनेचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच आपल्या विधानांमुळे वादात असतात. यावेळी मात्र ते वादग्रस्त चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत. मध्यंतरी कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता आली नाही तर मिळी कापण्याचं चॅलेंच दिलं होतं. पण त्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला होता. बांगर यांनी दिलेल्या चॅलेंचमुळे या निकडणुकीची राज्यभरात जोरदार चर्चा झाली होती. आमदार संतोष बांगर गेल्या काही वर्षांपासून हिंगोलीचे शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. २०१९ मध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बांगर यांनी कळमनुरीतून उमेदवारी दिली होती आणि या निवडणुकीत ते निवडूनही आले होते. दरम्यान शिंदे शिवसेनेत बंड करून गुवाहटीला गेले त्यावेळी बांगर त्यांच्या सोबत गेले नव्हते. मात्र त्यानंतर ते शिंदे गटात सामिल झाले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान बुधवारी शिवसेनेच्या आमदार अपात्रता निकालावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला.अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालात शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच असून धनुष्यबाण चिन्ह देखील शिंदे यांच्याच शिवसेना पक्षाचे असल्याचा निकाल दिला आहे. या निकालानंतर शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हातात धनुष्यबाण घेत मिरवणूक काढली आहे. दरम्यान 2024 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रा सह देशावर महायुतीचा भगवा फडकणार असून देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार आहेत, मात्र कदाचित असं झालं नाही तर आपण भर चौकात गळफास घेऊ असा पण बांगर यांनी बोलून दाखवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर शरीरात दिसतात 'हे' बदल

Sweet Food : मिठाई ते चॉकलेट, फ्रिजमध्ये गोड पदार्थ किती वेळ ठेवावेत?

Maharashtra Live News Update: केरळमध्ये 'मेंदू खाणारा अमिबा' घेतोय लोकांचा जीव

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विसर्जनासाठी सजला ‘श्री गणनायक’ रथ; केरळ मंदिराची प्रतिकृती पुण्यात उजळली पाहा मनमोहक VIDEO

Stress Relief Tricks : ऑफिसमध्ये काम करताना स्ट्रेस जाणवतोय? या ट्रिक करा फॉलो

SCROLL FOR NEXT