IAS Pooja Khedkar Saam Tv
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar: ऑडीवरून थेट बोलेरोवर; पूजा खेडकर यांनी वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला

IAS Pooja Khedkar Audi Car: आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आज वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला असून त्यांनी आज आपल्या खासगी ऑडी ऐवजी शासकीय महिंद्रा बोलेरो या वाहनाने प्रवास केला.

साम टिव्ही ब्युरो

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी आज वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून तडकाफडकी त्यांनी बदली झाल्यानंतर त्या आज त्यांनी जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी यांची भेट घेता आज आपला पदभार स्वीकारला. यातच आज कार्यलयातून बाहेर आल्यानंतर त्यांनी आपल्या खासगी ऑडी ऐवजी शासकीय महिंद्रा बोलेरो या वाहनाने प्रवास केला. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी वाहन असलेल्या ऑडीवर लाल दिवा लावला होता. यावरून मोठा वाद निर्माण झाला. यानंतर त्यांनी आज त्यांच्या ऑडी कारवरून लाल दिवा काढला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ

दरम्यान, प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पुणे पोलिसांनी खेडकर यांच्याविरोधात कारवाई सुरु केली असून पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पुण्यातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅशनल सोसायटीमध्ये त्यांचा आलिशान बंगला आहे. पोलीस त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले असता पूजा खेडकर यांच्या आईने पोलिसांनाच आरेरावी केली. याचाच व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर या खासगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरल्यामुळे चर्चेत आल्या. प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पूजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता.

तसेच त्यांनी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही मागणी केली. तसेच त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांनी अधिकाऱ्यांना दमबाजी, असा आरोप आहे. यातच पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांची दुसरीकडे बदली करावी, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांची बदली आता वाशीममध्ये करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

SCROLL FOR NEXT