IAS Pooja Khedkar Case Saam Digital
महाराष्ट्र

IAS Pooja Khedkar Case : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर नॉट रिचेबल?; मोठं कारण आलं समोर

IAS Pooja Khedkar Case Update : IAS पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू आहे.

Sandeep Gawade

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. अटकेच्या भीतीने त्या नॉट रिचेबल झाल्या आहेत. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. पुणे पोलिसांनी २ वेळा नोटीस देऊन सुद्धा पूजा खेडकर उपस्थितीत राहिलेल्या नाहीत.पुणे पोलिसांनी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू आहे.

पूजा खेडकर यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहेत. १९ जुलै रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) पूजा खेडकर यांना चुकीची माहिती दिल्याबद्दल सिव्हिलची उमेदवारी रद्द का करू नये, याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसंच पूजा खेडकर यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचा मोठा निर्णय UPSC घेतला होता.

UPSC नेे नागरी सेवा परीक्षा-2022 मध्ये पूजा खेडकर यांची तात्पुरती शिफारस केली होती. दरम्यान सध्या सुरू असलेल्या प्रकरणात UPSC ने सखोल तपास सुरू केला आहे. या तपासात पूजा खेडकर यांनी त्यांचं नाव, वडिलांचं आणि आईचं नाव, तिचे फोटो/स्वाक्षरी, तिचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून ओळख लपवून आयोगाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, तसंच दिल्लीत याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पुणे पोलिसांनी त्यांना २ वेळा नोटीस देऊन सुद्धा त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली होती. दिल्लीत गुन्हा दाखल झाल्याने अटकेच्या भीतीने पूजा खेडकर नॉट रिचेबल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT