Tukaram mundhe Mother Death  Saam tv
महाराष्ट्र

IAS तुकाराम मुंढे यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या व्यक्तीचे निधन

Tukaram mundhe Mother Death : IAS तुकाराम मुंढे यांच्या मातोश्रीचे निधन झालं. आईच्या निधनाने मुंढे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Vishal Gangurde

IAS तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचं निधन

आसराबाई यांचे पार्थिव बीडच्या ताडसोना गावी नेण्यात येणार

आसराबाई यांच्या पार्थिवावर ३ एप्रिल रोजी सकाळी होणार अंत्यसंस्कार

वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आईचं निधन झालं आहे. IAS तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं पुण्यात निधन झालं. त्यांचं पार्थिव बीडच्या ताडसोना या मूळगावी नेण्यात येणार आहे. आसराबाई यांच्या पार्थिवावर ३ एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) हे सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या कर्तव्यावर आहे. तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई यांचं वय जवळपास शंभरच्या आसपास होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.

तुकाराम मुंढे यांच्या आईचे निधन झाल्याने प्रशासकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर कुटुंबीय, नातेवाईक आणि गावकऱ्यांनी आसराबाई मुंडे यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली आहे.

आईच्या निधनाची वार्ता कळताच तुकाराम मुंढे हे पश्चिम बंगालमधून तातडीने पुण्यात निघाले. त्यांच्या आईच्या पार्थिवावर ताडसोना गावात उद्या सकाळी अंत्यसंस्कार केले जातील. आसराबाई यांच्या अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि ग्रामस्थ उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

तत्पूर्वी, प्रशासकीय सेवेत अतिशय शिस्तप्रिय सनदी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या मागील २१ वर्षात २५ वेळा बदल्या झाल्या आहेत. काही महिन्यापूर्वी त्यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर आता ते मंत्रालयात सचिव म्हणून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तसेच महसूल आणि वन विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT