Shiv Sena Uddhav Thackeray group Vs Shivsena Shinde Group Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना म्हणालो, 'दोन तासांत सर्व आमदारांना परत आणतो; फक्त...', शिंदे गटाच्या नेत्याचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Politics Latest News: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विकास हेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

अमोल कलये

रत्नागिरी, ता. ६ सप्टेंबर २०२४

Ramdas Kadam On Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकांआधी महायुतीमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधत टीकेची झोड उठवली होती. रामदास कदम यांच्या या भूमिकेने सेना- भाजपमधील नेत्यांमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळाले होते. मात्र आता अचानक रामदास कदम यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत असून विधानसभेला एकत्र लढणार असल्याचे म्हटले आहे. तसेच उद्धव ठाकरेंबाबतही एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

रामदास कदम नरमले..

भाजपच्या विरोधात टीकेची झोड उठवल्यानंतर शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी अचानक नरमाईची भूमिका घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे. आम्हाला महायुती टिकवायची आहे, जो चुकला त्याला सोबत घेऊन जायचं आहे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला विकास हेच आमचे ध्येय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदमचे स्वप्न पुर्ण केले, त्यासाठी त्यांचे धन्यवाद असे रामदास कदम यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरेंबाबत मोठा गौप्यस्फोट

"उध्दव ठाकरेंनी वडिलांच्या विचाराशी गद्दारी केली, असा पुनरुच्चार करत आमदार गुवाहाटीला गेल्यावर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता, असा मोठा दावाही रामदास कदम यांनी केला. तसेच अजून वेळ गेली नाही. तुम्ही काँग्रेस सोडतोय अशी पत्रकार परिषद घ्या, मी गुवाहाटीमधून सर्व आमदारांना दोन तासात परत आणतो असे मी म्हणालो होतो, पण उद्धव ठाकरेंनी शरद पवारांचे ऐकले," असा खळबळजनक गौप्यस्फोटही कदम यांनी यावेळी केला.

पुस्तकही लिहणार..

"उद्या गणपती बसणार आहेत. मी शपथ घेऊन सांगतो असे म्हणत ५० खोक्यांचा विषय येतो कुठे? गद्दारी कोणी केली? गद्दारीची व्याख्या काय आहे," असा सवाल रामदास कदम यांनी उपस्थित केला. तसेच शिवसेना का सोडली यावर मी पुस्तकही लिहणार आहे. असेही रामदास कदम यावेळी म्हणाले. दरम्यान, रामदास कदम यांच्या या दाव्यावरुन आता शिंदे गट अन् ठाकरे गटामध्ये पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

Remedies On Sunday: रविवारच्या दिवशी मीठाचे उपाय करणं ठरेल फायदेशीर; करियरमध्ये लाभ होऊन नकारात्मकता दूर होईल

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

SCROLL FOR NEXT