Kamala Mills fire : मोठी बातमी! कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरला भीषण आग; परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट, पाहा VIDEO

Kamala Mills Times Tower Fire : मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाईम्स टॉवरला आज शुक्रवारी (ता. 6 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली.
Kamala Mills fire
Kamala Mills fireSaam TV
Published On

मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवरला आज शुक्रवारी (ता. 6 सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. बघता-बघता आगीचा भडका उडाला. संपूर्ण टॉवरला आगीने विळखा घातला. आगीमुळे परिसरात काळ्याकुट्ट धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे 3 बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे. या भीषण आगीचा व्हिडीओ (Video) देखील समोर आला आहे. सध्यातरी या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. आगीचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या कमला मिल परिसरात (Mumbai Kamala Mills Fire) टाइम्स टॉवर ही इमारत आहे. हा संपूर्ण परिसरात गजबजलेला आहे. आज शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास या टॉवरवरील एका मजल्याला अचानक आग लागली.

बघता-बघता आगीचा भडका उडाला. क्षणार्धात आगीने रौद्ररुप धारण केल्याने परिसरात मोठी आरडाओरड सुरू झाली. स्थानिकांनी तातडीने या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. आगीची माहिती मिळताच पोलिसांसह (Police) अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

सुरुवातीला अग्निशमन दलाच्या 3 बंबांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाची अतिरिक्त कुमक वाढवण्यात आली. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.

आग आटोक्यात आणल्यानंतरच तिचे कारण समोर येईल, असं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मागील काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरात आगीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांची चांगलीच दमछाक होत आहे.

काही दिवसांपूर्वी बोरिवली येथील 22 मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग लागली होती. या आगीत 4 नागरिक घुसमटले होते. यातील एका वृद्ध नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाने अगदी शर्थीचे प्रयत्न करत ही आग अवघ्या अर्ध्या तासात आग विझवली होती.

Kamala Mills fire
Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेचा प्रवास होणार सुसाट, दोन नव्या मार्गिका तयार होणार; लोकलची संख्याही वाढणार!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com