Thackeray Group Saam
महाराष्ट्र

Thackeray: 'मला रात्रीची झोप लागत नव्हती, शिंदे गटात जाऊन चूक केली', बड्या नेत्याची ठाकरे गटात पुन्हा एन्ट्री, उघडले सर्व पत्ते

Maharashtra Politics: “मी शिंदे गटामध्ये जाऊन चूक केली,” असं स्पष्टपणे सांगत महिला नेत्या सुजाता शिंगाडे यांनी आज ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थित त्यांनी प्रवेश केला आहे.

Bhagyashree Kamble

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबतची चर्चा सुरू असताना शिंदे गटातील नेत्यानं स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. "मी शिंदे गटामध्ये जाऊन चूक केली," असं म्हणत महिला नेत्या सुजाता शिंगाडे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंचं दार ठोठावून उद्धव ठाकरेंच्या उपस्थित मशाल हाती घेतली आहे.

सुजाता शिंगाडे या महिला विभाग संघटक पदावर कार्यरत होत्या. त्यांनी जानेवारी महिन्यात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. मात्र, पदाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष, शिंदे गटाच्या सचिवकांकडून दुर्लक्ष आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वेळ दिली नसल्यामुळे त्यांनी पुन्हा स्वगृही येण्याचा निर्णय घेतला.

शिंगाडे यांनी आज ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित पुन्हा एकदा मशाल हाती घेतली आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंगाडे म्हणाल्या, 'स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या वादातून जानेवारी महिन्यात शिवसेना ठाकरे गटातून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, त्या ठिकाणी जनतेची कामे झाली नाहीत, आम्हाला वेळ दिला नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वेळ दिला नाही, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष झाले', अशी तक्रार शिंगाडे यांनी बोलून दाखवली.

शेवटी रश्मी ठाकरे यांना मेसेज करून माहिती दिली असल्याचं शिंगाडे यांनी सांगितलं. 'यासंदर्भात रश्मी ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली. आता पुन्हा माहेरी आली आहे. खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहे', असं शिंगाडे म्हणाले. 'खरी शिवसेना ही मातोश्रीची आहे. मी शिंदे गटामध्ये जाऊन चूक केली. शिवसेना सोडल्यानंतर मला रात्रीची झोप लागली नव्हती. हे सर्व कोटींच्या घरात पैसे देऊन घेत आहेत. सगळ्यांनाच शिंदे गटात त्रास होत आहे', असा खुलासा त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खात्यातून पैसे काढणं झालं सोपं; UPIमधून किती आणि कधी काढू शकणार पैसे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT