Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

मला स्वतःसाठी काही मागायचं नाही, तुम्ही काही द्यायचं ठेवलं नाही; पवारांची भावनिक साद

मला चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलंय, बावन्न वर्ष निवडून येण्याची संधी देत आहात केंद्रात देखील मला मंत्रीपद मिळालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी -

उस्मानाबाद : मला स्वतःसाठी काही मागायचं नाही कारण तुम्ही मला काही द्यायचं ठेवलं नाही असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी भावनिक साद घालत, मी या लहान कार्यक्रमाला का आलो असं काहीना वाटत असेल. तुम्ही मला चार वेळा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलंय, बावन्न वर्ष निवडून येण्याची संधी देत आहात केंद्रात देखील मला मंत्री पद मिळालं आहे.

त्यामुळे आता मला काही नको. असं वक्तव्य पवार यांनी केलं ते आज उस्मानाबाद जिल्हा दौर्‍यावर होते जिल्ह्यातील समुद्रवाणी आणि पाडळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण खा. पवार यांच्या हस्ते करण्यात आले दरम्यान कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, मला आता काही नको मात्र, राज्य चालवायचे असेल, राज्याच भविष्य उत्तम घडवायचे असेल तर पुढच्या काळाचा विचार करावा लागतो. कर्तृत्वाचा मक्ता फक्त पुरुषांनी घेतला नाही. महिलाही त्यामध्ये मागे नाहीत. कर्तृत्वाला संधी दिली पाहिजे, असं म्हणत युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी म्हणून मी इथे आल्याचेही शरद पवारांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना E-KYC अनिवार्य, कुठे अन् कसं करायचं? स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जालन्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, 997 घरांसह 105 दुकानांमध्ये शिरले पावसाचे पाणी

Maharashtra Rain: पुढील ३ तासांत १४ जिल्ह्यात मुसळधार पाऊस; मुंबई, पुण्यासह नाशिकला झोडपणार, वाचा हवामानाचा अंदाज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो हे काम करा, अन्यथा ₹ १५०० बंद होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

Jio Recharge Plan: जिओ 209 रुपयांचा रिचार्ज प्लॅन; ग्राहकांना मिळणार डेटा, कॉलिंग अन् बरंच काही..., वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT