आम्ही ST विलीकरणाच्या पाठीशी, 2024 ला काँग्रेस विलीनीकरणाची भूमिका मांडेल - नाना पटोले

मंडल आयोग आले त्यावेळी कमंडल आणणारे कोण होते हे सगळ्यांना माहीत आहे.
Nana Patole
Nana PatoleSaam TV
Published On

मुंबई : एसटी कामगारांचे राज्य शासनात विलीकरण करण्याच्या मागणीच्या आम्ही पाठीशी आहोत, मात्र आता विलीनीकरण सध्या शक्य नसल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज पत्रकार परिषदेत केलं. तसंच 2024 नंतर विलीनीकरण करता येईल का यासाठी आमचा प्रयत्न असेल त्यासाठी 2024 ला विलीनीकरणाची भूमिका काँग्रेस मांडेल असं त्यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले, राज्यशासनाकडे ST समितीचा अहवाल आला आहे. भाजप ST आंदोलनाच्या मागे राहत कामगारांना बेरोजगार करू पाहत आहे. न्यायालयाचा निर्णय कामगारांनी मान्य करावा. एसटी कामगारांना ( ST Employee) अत्यल्प पगार मिळत आहे. मात्र विलीनीकरणाची आताची स्थिती नाही. एसटी कामगारांचे विलीकरणाच्या आम्ही पाठीशी आहोत. 2024 नंतर विलीकरण करता येईल का असा आमचा प्रयत्न असेल त्यासाठी 2024 ला विलीकरणाची भूमिका काँग्रेस मांडेल असं त्यांनी सांगितलं.

Nana Patole
'राणेंनी मोदी-शहांच नाव नाही घेतलं तर त्यांची नोकरी जाईल'

भाजप ओबीसी समाजाचा शत्रू -

भाजप ओबीसी (OBC) समाजाचा शत्रू आहे. नागपूर जिल्हा परिषदेत ओबीसी आरक्षण कोणी कसे संपवले हे जनतेला माहीत आहे. आरक्षण संपुष्टात आणण्याचा मोदींचा चेहरा समोर आला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केवळ महाराष्ट्रात नाही. केंद्राने हस्तक्षेप करत ओबीसीचा प्रश्न सुटू शकते हे भाजपला माहीत आहे. ओबीसीचा नाही तर मागसावर्गीय समाजाचे आरक्षण ही भाजपला संपवायचे आहे. मंडल आयोग आले त्यावेळी कमंडल आणणारे कोण होते हे सगळ्यांना माहीत आहे असा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com