Udayanraje Bhosale  SaamTV
महाराष्ट्र

मी राजकारणात ढवळाढवळ करत नाही; मात्र माझ्या बाबतीत सगळे करतात - उदयनराजे

मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात.

संभाजी थोरात साम टीव्ही कराड

कराड : आता मी ढवळा ढवळ करु का? उदयनराजे भोसलेंचा जिल्हा बँक निवडणुकीतील District Bank Election राष्ट्रवादी व विरोधकांना सवाल. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात. तेसच मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झालं सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही. असं देखील ते शिवेंद्रसिंहराजेंना Shivendrasinharaje यांना उद्देशून म्हणाले.

हे देखील पहा -

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,Former Chief Minister Prithviraj Chavan ॲड. उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कमराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले Udayan Raje Bhosle यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले.

'अजून गाठी भेटी संपायच्या आहेत. सर्व मतदार आहेत. कुठे जायचे ते मी ठरवतो. सर्व समावेशक पॅनेलमध्ये जायचे का नाही ठरवायचे चालले नाही. मी लोकांच्या सोबत आहे. मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही. मतदारांनी सांगितले तर उमेदवारी माग घेईन बाकी कोणाच्या सांगण्याने नाही. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का ? पण माझा विषय आला की सगळे ढवळा ढवळ करतात.' असं उदयनराजे म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: जळगाव शहरात अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार, घटनेने परिसरात खळबळ

Maharashtra Politics: अपक्ष उमेदवाराकडून संभ्रम करण्याचा प्रयत्न, ठाकरे गटाच्या उमेदवाराची पोलिसात धाव

Pune : पुण्यात जोरदार राडा, व्यवहारे अन् धंगेकर आमनेसामने, कार्यकर्त्यांमध्ये टशन!

Mrunal Dusanis: ४ वर्षांनी मायदेशी परतली, आधी मालिकेत पुनरागमन अन् आता नवऱ्यासोबत व्यवसायात पदार्पण;मृणाल दुसानिसचं मोठं पाऊल

IND vs AUS: चेतेश्वर पुजाराची बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत एन्ट्री! या नव्या भूमिकेत दिसणार

SCROLL FOR NEXT