नाशिकचा अभिमान वाटतो, उद्धव ठाकरेंनी केले कौतुक 
महाराष्ट्र

नाशिकचा अभिमान वाटतो, उद्धव ठाकरेंनी केले कौतुक

कोरोना काळात नाशिक प्रशासनाकडून उत्तमरित्या काम करण्यात आले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांच्या हस्ते नाशिकमधील (Nasik) महाराष्ट्र पोलिस अकादमीतील (Maharashtra Police Academy) विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य अर्धा डझन मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच नाशिक दौरा होता.

भूमिपूजनप्रसंगी दाखवलेल्या प्रकल्पचित्र अगदी हुबेहूब त्यापेक्षाही अधिक चांगले प्रकल्प कोविड काळात पुर्ण केले गेले याचा अभिमान वाटतो. कोरोना काळात नाशिक प्रशासनाकडून उत्तमरित्या काम करण्यात आले. अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे कौतुक केले आहे.

नाशिकमधील त्र्यंबक रस्त्यावरील शंभर एकर जागेतील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. या अकादमीला सक्षम करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक, हॉकी मैदान यांसह कंपोझिट फायरिंग रेंज, व्हॉलीबॉल आणि बास्केट बॉल मैदान अशा अनेक सोयीसुविधा उपलब्ध करु दिल्या जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Supari Recipe: डायजेशनसाठी उत्तम, चवीलाही जबरदस्त; घरगुती आवळा सुपारी कशी कराल?

ESIC Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी, ESIC मध्ये मोठी भरती, पगार १७०००० रुपये; वाचा सविस्तर

Mahesh Tilekar : "माणूस शून्य लोक..."; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' वागण्यानंतर महेश टिळेकर यांचे डोळे उघडले, सांगितला खास किस्सा

Maharashtra Live News Update: अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर...

Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी, शहरातील वाहतुकीत मोठे बदल; या मार्गावरून करा प्रवास

SCROLL FOR NEXT