sharad pawar - Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: ''मी UPA चं नेतृत्व करायला...''; शरद पवारांचं मोठं विधान...

मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष बनवा अशी मागणी होत आहे.

संभाजी थोरात

कोल्हापूर: मागच्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना UPA चे अध्यक्ष बनवा अशी मागणी होत आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं अशी मागणी जाहीर कार्यक्रमात केली आणि तसा ठराव मांडला आणि तो मंजूरही झाला. त्यानंतर देशात राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली. परंतु यावरती शरद पवार (Sharad Pawar) काय बोलणार, त्यांची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष होते. आता शरद पवारांनी कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले...

“मी UPA चे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेणार नाही. मध्यंतरी आमच्या एका तरुणाने युपीएचा अध्यक्ष व्हावा यासाठी ठराव केला. मला त्यात अजिबात रस नाही, मी त्याच्यात पडणार नाही. मी काही जबाबदारी घेणार नाही. पण एकत्र येऊन काही पर्याय देता येत असेल तर त्यांना मी सहकार्य, करायला तयार आहे,” असं शरद पवार यावेळी म्हणाले.

भाजपला (BJP) रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावं याची मागणी मागच्या अनेक दिवसांपासून होत आहे. यावर शरद पवारांनी काँग्रेसला डावलून चालणार नाही कारण काँग्रेसहा देशाच्या गावागावत पसरलेला पक्ष आहे. प्रत्येक गावात काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे जर व्यापक काही करायचे असेल तर काँग्रेसलाही सोबत घ्यावं लागेल असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.

त्यादिवशी दिल्लीत नेमकं घडलं?

दिल्लीत मागच्या मंगळवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्ष मेहबूब शेख यांनी शरद पवारांना युपीएचं अध्यक्ष करावं असा ठरवा मांडला. त्या बैठकीत स्वत: शरद पवार ही उपस्थीत होते. तो ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला होता. शरद पवार हे देशातील सर्वात अनुभवी नेते आहेत. भाजपला रोखण्यासाठी शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणू शकतात म्हणून त्यांनी युपीएचं अध्यक्ष व्हावं अशी भूमिका घेण्यात आली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : घरातील फ्रीजचा अचानक स्फोट, ३ जणांचा जिवंत जळून मृत्यू, मुंबईतील भयानक घटना

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

Success Story: मराठी माध्यमातून शिक्षण, आधी MBBS मग UPSC; सोलापूरचे भगवंत पवार झाले वैद्यकीय अधिकारी

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज आणि उद्या मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा

अंबरनाथ नगरपालिकेत नवा ट्विस्ट; भाजपच्या खेळीवर शिंदेसेनेची कुरघोडी

SCROLL FOR NEXT