दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून! ओंकार कदम
महाराष्ट्र

दारुड्या पत्नीचा पतीनेच केला खून!

सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे हि घटना घडली असून, या महिलेला दारूचे व्यसन असल्याच्या कारणावरून पतीने तिचा खून केला आहे.

ओंकार कदम

सातारा - सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागठाणे येथील एका महिलेचा दारूचे व्यसन असल्याच्या कारणावरून खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचा खून पतीने लाकडी दांडके डोक्यात घालून केला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

मालन बबन गायकवाड या 55 वर्षीय महिलेला दारूचे व्यसन असल्याने ते पतीला न आवडल्याने दोघांच्यात वारंवार भांडणे होत होते. दोघांमध्ये दारूच्या कारणातून भांडणे झाली यामध्ये पती बबन गायकवाड याने पत्नीला लाकडी दांडकाने मारहाण केली यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला.

संशयित आरोपी असलेल्या पती बबन गायकवाडला बोरगाव पोलिसांनी अवघ्या 6 तासांत ताब्यात घातले असून आरोपीच्या घरात 300 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Stone : तुम्हाला किडनी स्टोन झालाय? ३० दिवस आधी दिसतील 'ही' लक्षणे, दुर्लक्ष कराल तर....

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं

बुलेट ट्रेनलाही देईल टक्कर! नव्या 'वंदे भारत'चा डॅशिंग लूक समोर; एकदा व्हिडीओ पाहाच

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT