अकोल्यात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली

या सायकल रॅलीत बहुसंख्येने युवक काँग्रेसचे पदाधिकरी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अकोल्यात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली
अकोल्यात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅलीजयेश गावंडे
Published On

अकोला: वाढती महागाई, खाद्य तेलाच्या वाढत्या किमती, घरगुती गॅस सिलिंडरच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींसह पेट्रोल व डिझेल दरवाढीने उच्चांक गाठला असून सामान्य जनतेचे जीवन जगणे कठीण झाले आहे. Youth Congress cycle rally against fuel price hike in Akola

हे देखील पहा -

याच्याच निषेधार्थ अकोला शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सदर सायकल रॅली स्थानिक स्वराज्य भवन येथून निघाली होती. या सायकल रॅलीचा मार्ग पोस्ट ऑफिस चौक, सिविल लाइन्स चौक, जवाहर नगर चौक, राऊतवाडी चौक, सातव चौक, रेल्वे स्टेशन चौक, टिळक रोड, सिटी कोतवाली चौकातून गांधी रोड व स्वराज्य भवन येथे समारोप असा होता.

अकोल्यात इंधन दरवाढीविरोधात युवक काँग्रेसची सायकल रॅली
बुलढाण्यात फोटोशुट करून परतणाऱ्या दोन युवकांवर काळाचा घाला !

अकोला जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ऍड.महेश गणगणे व शहराध्यक्ष अंशुमन देशमुख यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी या रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com