Jalna car accident Saam Tv
महाराष्ट्र

Jalna Car Accident Update: भावाचा संशय खरा ठरला! पतीनेच केली पत्नीची हत्या, जालना बर्निंग कार प्रकरणात धक्कादायक खुलासा

Priya More

लक्ष्मण सोळुंके, जालना

Jalna Burning Car Update : जालनामध्ये काही दिवसांपूर्वी एका कारला अपघातानंतर आग (Jalna Car Accident) लागल्याची घटना घडली होती. या आगीमध्ये एका महिलेचा जिवंत जळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

पण आता या बर्निंग कार प्रकरणात (Jalna Burning Car) धक्कादायक माहिती समोर आली आहे. पतीनेच अपघाताचा बनाव रचत आपल्या पत्नीला जीवंत जाळले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Jalna Police) महिलेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेगाववरुन गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परत येत असताना अमोल सोळुंकेच्या कारला अपघात झाला होता. अपघातानंतर कारने पेट घेतला आणि कारचे सेंटर लॉक हे लॉक झाले होते. या कारमध्ये अमोलची पत्नी सविता बसल्या होत्या. गाडी लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेर येता आले नाही आणि या आगीमध्ये सविता यांचा जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. मंठा तालुक्यातील तळणी फाट्या जवळील महावीर जिनिंग समोर घडली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

या अपघाताचा तपास मंठा पोलीस करत होते. त्यांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला होता. पण घटना स्थळाची पाहणी केल्यानंतर सविता यांच्या भावाला संशय आला आणि त्याने या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. सविता यांना मुल होत नसल्याने त्यांचा पती अमोलने अपघाताचा बनवा करून आपल्या बहिणीला कारमध्ये जिवंत जाळल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अमोलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी अमोल साळुंके यांची कसून चौकशी केली असता याप्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली. अमोलने आपल्या पत्नीच्या हत्येची कबुली दिली. अमोलने पोलिसांना सांगितले की, लग्न होऊन 15 वर्षे झाल्यानंतर ही पत्नीला मूल होत नव्हते. त्यामुळे देवदर्शनाला जाण्याचा बहाणा केला.

त्यानंतर देवदर्शनाहून रात्रीच्या सुमारास घरी परत येत असताना आपल्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे मंठा तालुक्यातील तळणी फाट्यावर रस्त्याच्या कडेला गाडी उभी केली. त्यानंतर गाडीमध्ये ज्वलंत पदार्थ टाकला. त्यानंतर गाडीचे सेंटर लॉक करून पत्नीला जिवंत जाळले.' पोलिसांनी याप्रकरणी अमोलला अटक केली. या घटनेमुळे पोलिसांसह सविता यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT