Dhule Crime News Saam TV
महाराष्ट्र

Dhule Crime : भयंकर! जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीला त्याने एका क्षणात संपवलं; मन सुन्न करणारी घटना

धुळे शहरातील साक्री रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली.

भूषण अहिरे

Dhule Crime News : पती-पत्नीमध्ये अनेकदा लहान मोठे वाद होत असतात. अनेकदा हे वाद विकोपाला जातात. त्यामुळे मोठे गुन्हे देखील घडतात, अशीच एक घटना धुळे शहरातून समोर आली आहे. घरगुती वादातून एका पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉडने वॉर करून तिची हत्या केली. (Latest Marathi News)

धुळे (Dhule) शहरातील साक्री रोड परिसरात ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.दिपाली कानडे (वय 28 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) मृत महिलेच्या पतीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिपाली आणि तिच्या पतीमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वाद होत होते. शनिवारी (28 जानेवारी) पुन्हा त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, दिपालीच्या पतीने तिच्या डोक्यात लोखंडी रॉडने वॉर केला.

या घटनेत दिपालीच्या डोक्याला गंभीर (Crime) दुखापत होऊन ती खाली पडली. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपालीला नातेवाईकांनी तात्काळ खाजगी वाहनाने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

काँग्रेसनं विदर्भात भाकरी फिरवली! नव्या नेत्याकडे सोपवली प्रभारी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी

Tiger Shroff: टायगर श्रॉफने विकला मुंबईतील आलिशान फ्लॅट; गोळीबाराच्या घटनेनंतर ६ दिवसांत घेतला मोठा निर्णय, किती रुपयांची झाली डील?

मुंबईमधील हायप्रोफाईल भागातील इमारतीला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी रहिवाशांची पळापळ

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

SCROLL FOR NEXT