Nashik News : मालेगावात 'पठान' पाहताना चाहत्यांची हुल्लडबाजी; थेट थिअटरमध्येच फटाके फोडले, VIDEO व्हायरल

नाशिकच्या मालेगावातील एका थिअटरमध्ये पठान हा चित्रपट पाहताना शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी हुल्लडबाजी केल्याचं समोर आलं आहे.
Malegaon Pathan Movie
Malegaon Pathan MovieSaam TV

मालेगाव : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा पठान हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाला बॉयकॉट करा, असं म्हणणाऱ्या प्रेक्षकांनी 'पठाण'ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पठाणचे थिअटर हासफुल्ल असून प्रेक्षक हुल्लबाजी करताना दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

Malegaon Pathan Movie
Osmanabad : डोक्यात ऑक्सिजन सिलिंडर पडून ९ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मन सुन्न करणाऱ्या घटनेचा VIDEO समोर

अशातच, नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या मालेगाव (Malegaon) येथील एका थिअटरमध्ये पठान हा चित्रपट पाहताना शाहरुख खानच्या काही चाहत्यांनी हुल्लडबाजी केल्याचं समोर आलं आहे. चित्रपट सुरू असताना चाहत्यांनी थेट थिअटरमध्येच फटाके फोडले आहेत.

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ (Viral Video) देखील समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे थिअटरमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मध्यस्थी केल्याने वेळीच तणाव निवळला. यापूर्वी देखील पठाण चित्रपट सुरू असताना,  शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) चाहत्यांनी हुल्लबाजी केली होती.

आता तर थेट थिअटरमध्येच फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे थिअटरला आग लागून मोठी दुर्घटना होण्याची असते. मात्र, त्याची कसलीही भीती आणि फिकीर न बाळगता बेजबाबदारपणाने टवाळखोर चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

शाहरुख खान स्टारर 'पठान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई करत जगभरात १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाला देशातूनच नाही तर परदेशातूनही भरभरून प्रेम मिळत आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com