Chhatrapati Sambhajinagar Saam TV
महाराष्ट्र

Husband End Life due to Wife : पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून ३० वर्षीय पतीने जीवन संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

Crime news in Chhatrapati Sambhajinagar : सिल्लोड शहरातील राजावाडी परिसरात ही घटना घडली आहे.

डाॅ. माधव सावरगावे

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. पत्नीच्या अनैतिक प्रेम संबंधाला कंटाळून 30 वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्येचे टोकाचं पाऊल उचललं आहे.

प्रदीप आरके असं मृत पतीचं नाव आहे. सिल्लोड शहरातील राजावाडी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी भाऊसाहेब विजय आरके व मृताच्या पत्नी विरोधात सिल्लोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या मृताच्या पत्नीचे भाऊसाहेब आरकेसोबत अनैतिक संबंध होते. प्रदीप हा प्रकार समजल्यानंतर दोघांना अनेकवेळा समजावून सांगितले. मात्र दोघेही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यांच्यात कुठलाही बदल होत नव्हता. (Crime News)

उलट त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये येणाऱ्या प्रदीपलाच ते शिवीगाळ करून धमकी देत असत. सततच्या या त्रासाला कंटाळून प्रदीप कंटाळला होता. या त्रासामुळे तो मानसिक तणावात होता. यातून त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. (Latest Marathi News)

प्रदीपने आत्महत्येआधी एक चिट्ठीही लिहिली आहे. त्याच्या खिशात ही चिठ्ठी सापडली. त्यात माझ्या मृत्यूला माझी पत्नी व तिचा प्रियकर जबाबदार असल्याचे त्याने नमूद केले आहे. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोणत्याही प्रकारची गुंडागर्दीत नको पारदर्शक कारभार करणारी नगरपालिका हवी - देवेंद्र फडणवीस

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

SCROLL FOR NEXT