Kolhapur HSRP Number Plate Scam News Saam Tv
महाराष्ट्र

HSRP Number Plate : तुम्ही कार किंवा बाईकला लावलेली HSRP नंबर प्लेट बोगस तर नाही ना? ही बातमी वाचून 440 व्होल्टचा झटका बसेल!

Kolhapur HSRP Number Plate Scam News : कोल्हापूर जिल्ह्यातील साजणी गावात बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर पोलिसांनी छापा टाकत ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. एका आरोपीला अटक असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • कोल्हापूरमध्ये बनावट HSRP नंबर प्लेट कारखान्यावर छापा

  • ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

  • संतोष बबन यादव अटकेत; गुन्हा दाखल

  • गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची मोठी कारवाई

रणजित माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हातकणंगले तालुक्यातील साजणी गावात सुरू असलेल्या या अवैध कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत तब्बल ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहनांवर बसवण्यात येणाऱ्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट अर्थात HSRP नंबर प्लेटची बनावट निर्मिती सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने साजणी गावात छापा टाकला. या कारवाईत नंबर प्लेट तयार करण्यासाठी वापरली जाणारी दोन मशीन, तयार व अर्धवट तयार नंबर प्लेट्स तसेच अन्य साहित्य असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी ३१ वर्षीय संतोष बबन यादव याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट नंबर प्लेटच्या माध्यमातून गुन्हेगारी कृत्यांना चालना मिळू शकते, त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे.बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला असून वाहनधारकांनी अधिकृत केंद्रातूनच नंबर प्लेट बसवून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मोठी बातमी! स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

खरातच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय

तटकरे-चाकणकर बिझनेस पार्टनर, खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारांचा खळबळजनक दावा, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

सैतान बापानं मुलीला लटकवलं, चोरीच्या संशयातून जन्मदात्याचं सैतानी कृत्य, सांगलीत काळीमा फासणारी घटना

SCROLL FOR NEXT