वाल्मिक कराड यांच्या नावावर आणि इतरांच्या नावावर किती संपत्ती आहे हे कोण शोधणार आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होता. त्या वेळेची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचा तपास झाला पाहिजे. योग्य तपास करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु सरकार याच्यात पक्षपातीपने वागत आहे.
कोट्यावाधीची मालमत्ता असतातना ईडी मात्र साधी नोटीस देत नाहीय, विचारणा करत नाही. तपास करत नाही. त्यामुळे या तपासा विषयी संभ्रम आहे. बीड प्रकरनाच्या तपासावर आम्ही समाधानी नाही आहोत. अजून एक आरोपी फरार आहे. अनेक व्हिडीओ माध्यमे समोर अनंत आहेत. पण पोलिसांना माहित नाही. मीडियामध्ये व्हिडीओ येत आहेत. पण पोलिसांकडे काही नाही. पोलिसांकडे रेकॉर्ड नाहीत. पोलीस अजून यात तपास योग्य करत नाहीत. फडणवीस यांना सगळं माहित आहे असे अंबादास दानवे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील उपोषण
मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला आमच्या शुभेच्छा. सरकार याबाबतीत कमी पडले आहे. सरकारने या संदर्भात संसदेत कायदा केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली असताना खिशात मात्र सरकारने आरक्षणाविषयी कुठलेही तूच्छ पावले उचललेली नाहीत असे अंबादास दानवे म्हणाले.
चार खासदार शिंदे गटात जाणार
असं काही होणार नाही आणि याबाबत तुम्हाला तसं काही माहिती नाही, असे दावे केले जातात. आमदार अभिषेक खासदारांविषयी दावे करतात. परंतु असं काही होणार नाही. मातोश्रीवर आरोप करत अनेक जण ठाकरे शिवसेना सोडून जात आहे. ठाकरे गटावर आरोप करण्यासाठी नांदेड जिल्ह्याची ही फॅशन झालेली आहे. अशा स्वरूपाचे आरोप करत असतात. बाकीच्या जिल्ह्यात अशा पद्धतीचे आरोप होत नाहीत. परंतु नांदेड जिल्ह्यातच असे आरोप होतात. नांदेड जिल्ह्याची फॅशन झालेली आहे. संघटना ही एका व्यक्तीच्या जीवावर चालत नाही असे अंबादास दानवे पत्रराप परिषदेत म्हणाले.
धनंजय मुंडे राजीनामा
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या एकाच नाण्याच्या बाजू आहेत. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि या सरकारने देखील मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
उद्धव ठाकरे यांनी सांगितलेला आहे की योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. स्थानिक नेतृत्वावर हा सगळा निर्णय अवलंबून असेल. स्थानिकांच्या भूमिका देखील यात महत्त्वाच्या असतील. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा मोठे असतात. त्यामुळे जागा वाटप करणे सोपं काम नसतं अवघड काम असतं. ज्या ज्या युनिटला वाटतं स्वबळावर लढावं ते आम्ही परवानगी देऊ.
एसटी भाडेवाढ
तीन महिन्यापूर्वी एसटीच्या महामंडळाच्या उपाध्यक्षांनी एसटी फायद्यात आहे. ती खूप चांगली चालू आहे. या प्रकारची घोषणा केली होती. त्यानंतर मी नागपूरच्या अधिवेशनात एसटी मधील 2800 कोटी रुपयाचा घोटाळा समोर आणला होता. पतीने खाजगी बसेस चालतात. तेराशे बसेस घेण्याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी थांबवलेली आहे. एसटी महामंडळामध्ये एकीकडे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होतो. आणि एकीकडे एसटी तोट्यात गेली असं देखील सांगण्यात येतं. सर्व प्रक्रियेत ग्राहकाच्या खिशाला कात्री लागत आहे शिवसेना याविषयी आंदोलन करण्यात वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरणार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.