Dhule Crime: सरपंच आणि माजी सरपंच 2.5 लाख लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकले

Dhule News: धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात सरपंचाने लाच मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 लाख रुपयांची लाच स्वीकारताना सरपंचाला रंगेहात पकडून अटक केली आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
Dhule News
Dhule Newsgoogle
Published On

धुळे तालुक्यातील नंदाणे गावातील सरपंच रविंद्र पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाठ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईत अडकले आहेत. तक्रारदाराकडून पेट्रोल पंप उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी या दोघांनी 2.5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात एक लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या घटनेने ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार उघडकीस आला असून, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

धुळे तालुक्यातील नंदाणे येथील गट क्र. 59/3 मध्ये तक्रारदाराच्या शेतजमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळवण्यासाठी कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी 1 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार, जिल्हाधिकारी कार्यालयाने नंदाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्रामसेवकांच्या नावे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे पत्र जारी केले. हे पत्र तक्रारदारांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांच्याकडे सादर केले होते. पुढील प्रक्रियेसाठी तक्रारदारांकडून पाठपुरावा सुरू होता, मात्र कामात अडथळे येत असल्याचे पुढे उघड झाले.

Dhule News
Central Railway Mega Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर ५ दिवस मेगा ब्लॉक

तक्रारदार आणि त्यांचे मित्र वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच रविंद्र निंबा पाटील आणि ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेत पाठपुरावा करत होते. यावेळी सरपंच पाटील यांनी ग्रामपंचायतीत ठराव करुन तक्रारदाराला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. या संदर्भात तक्रारदार यांनी 24 जानेवारी 2024 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार, लाच मागणी करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.

Dhule News
Western Railway: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक, प्रवाशांचे मेगा हाल! दादर, अंधेरीसह प्रत्येक स्टेशनवर गर्दी

धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता, सरपंच रविंद्र पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाठ यांनी तक्रारदाराकडून 2 लाख 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 1 लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना दोघांनी तडजोड केली होती. सापळा कारवाई दरम्यान, सरपंच पाटील यांनी तक्रारदाराकडून 1 लाख रुपये लाच स्वीकारली आणि ती माजी सरपंच शिरसाठ यांना दिली. दोघांना रंगेहात पकडून लाचलुचपत विभागाने अटक केली. त्यावर, सरपंच आणि माजी सरपंच यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dhule News
Viral Video: अरे देवा... गाजराचा हलवा समजून चुकून लाल भडक मिरच्या खाल्ल्यानंतर माकडाचे झाले हाल, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com