ह्रदयद्रावक: खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 3 भावंडांचा जागीच मृत्यू राजेश काटकर
महाराष्ट्र

ह्रदयद्रावक: खड्डा चुकविण्याच्या नादात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात; 3 भावंडांचा जागीच मृत्यू

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला 18 वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या 15 वर्षीय योगेश काशीनाथ म्हेत्रे या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व वय वर्ष 20 रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकी वरुन निघाला होता.

राजेश काटकर

परभणी : जिंतूर शहरापासून 3 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या अकोली शिवारातील रस्त्यावर खड्डा चुकविण्याचा नादात दुचाकी व ट्रकमध्ये घडलेल्या भीषण अपघातात दोन सख्या भावासह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय हेलवणारी घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मयत तिन्ही भावंडे मालेगाव (Malegaon) येथील रहिवासी असल्यामुळे समस्त मालेगाव ग्रामस्थांवरती शोककळा पसरली आहे.

जिंतूर तालुक्यातील मालेगाव (Malegaon in Jintur taluka) येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात शिक्षण घेत असलेला 18 वर्षीय अभिषेक काशीनाथ म्हेत्रे हा आपल्या 15 वर्षीय योगेश काशीनाथ म्हेत्रे या सख्या भावाला शहरातील जवाहर विद्यालयात सोडण्याकरिता व वय वर्ष 20 रामप्रसाद विश्वनाथ या चुलत भावाला कामावर सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक MH 26 AV 2834 वर जिंतूरच्या दिशेने निघाला होता.

अकोली शिवारातील पुलाजवळ खड्डा चुकविण्याचा नादात समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या Truck क्रमांक MH 18 BG 6270 या ट्रक वरती तिघे जण जोरात आदळल्याने ट्रकने तिघांना चेंगरत नेले. सदरील भीषण अपघातात दोन सख्या भावंडांसह एका चुलत भावाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस व मालेगावच्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिका चालक यांच्या मदतीने मयताचे मृतदेह शासकीय रुग्णालयात (Government Hospital) दाखल केले आहे. एकाच कुटुंबातील दोन सख्खे व एक चुलत भावंडांचा आघातात जागीच मृत्यू झाल्याने मालेगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio Recharge Plan: जिओची नवी ऑफर! गेमिंग प्लॅनची सुरुवात फक्त ४८ रुपयांपासून; डेटा, कॉलिंग अन् दमदार ऑफर्स

Maharashtra Live News Update: धाराशिव जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर

Red Alert : पुढील ४८ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे, तब्बल २२ जिल्ह्यांना रेड अलर्ट, शक्य असेल तर घरात राहा

Success Story: विदेशात शिक्षण, लाखो रूपयांची नोकरी सोडली अन् झाला IPS, अमित जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Kaam Trikon Yog: 18 वर्षांनी बनला काम त्रिकोण योग, 'या' 3 राशींना मिळणार भरपूर पैसा

SCROLL FOR NEXT