महाराष्ट्र

पंढरपुरात भीषण अपघात; भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू

Pandhapur accident : पंढरपुरात भीषण अपघात झाला आहे. भरधाव टेम्पो विहिरीत कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

पंढरपुरात अपघाताचा भीषण थरार

पंढरपुरात भाविकांवर काळाचा घाला

भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू

भरत नागणे, साम टीव्ही

सोलापूरच्या पंढरपुरातून अपघाताची मोठी बातमी हाती आली आहे. सोलापूरच्या म्हसवड- पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ टेम्पो विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातामधील सर्व मृत भाविक पंढरपूरच्या रांजणी गावचे आहेत. या भीषण अपघातानंतर संपूर्ण पंढरपुरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवड-पंढरपूर मार्गावरून सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सिद्धनाथांचं दर्शन करून गावाकडे परताना माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावानजीक एका विहिरीत टेम्पो कोसळला. टेम्पो कोसळून भीषण अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पुरुषांसहित महिला, लहान मुलांचा देखील समावेश आहे.

अपघात झाल्यानंतर घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी झाली. तांदूळवाडीमधील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी मदतीला सुरुवात केली. गावकरी पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. अपघातातील मृतांची नावे अद्याप हाती आलेली नाहीत. अपघातातील मृत भाविक एकाच कुटुंबातील असल्याचा दावा केला जात आहे. तांदूळवाडीत नाशिकच्या दिंडोरीसारखी घडलेल्या अपघाताची घटना घडली आहे. पंढरपुरातील या अपघातामुळे राज्यातील उघड्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रांजणी गावात हळहळ

पंढरपूरच्या रांजणी गावातील एक ग्रुप देवदर्शनासाठी गेला होता. या ग्रुपमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुले होते. या ग्रुपने सिद्धनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. सिद्धनाथांचं दर्शन घेऊन घरी परतताना काळाने घाला घातला. भाविकांचा टेम्पो थेट विहिरीत कोसळला. अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रशासनाकडून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भाविकांच्या मृत्यूने रांजणी गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर

भेसळयुक्त दुधानंतर आता FDAच्या निशाण्यावर मिसब्रँडेड सौंदर्यप्रसाधने; 34.61 लाखांचा साठा जप्त

ठाकरेंच्या खासदाराच्या कारचा अपघात; ताफ्यातल्या गाड्या एकमेकांवर आदळल्या|VIDEO

Gold Rate : दिवाळीपर्यंत सोन्याच्या दरात विक्रमी वाढ होणार; तज्ज्ञांचा मोठा इशारा

Skin Care: चेहऱ्यावरचा डलनेस कमी करुन ग्लोईंग स्किन पाहिजे? मग हा घरगुती स्क्रब नक्की वापर

SCROLL FOR NEXT