बालाजी सुरवसे, धाराशिव प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी
Dharashiv accident : बीड आणि धाराशिवमध्ये गेल्या काही दिवसांपासून संतप्त वातावरण सुरू आहे. दोन वर्षांपासून धाराशिव आणि बीडमध्ये पवनचक्की राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. पण आता याला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या वाहनाने दोन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने त्या वाहनाला पेटवून दिले. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने दोन जणांना चिरडल्याची घटना घडली. चांद शेख आणि वसंत जगताप यांचा पवनचक्कीच्या वाहनाच्या धडकेत जागावरच मृत्यू झाला. हे वाहन पवनचक्कीसाठी खडी आणि वाळू याचं मिश्रण वाहून नेणाऱ्या वाहनांकडून धडक दिली. त्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला अन् संतप्त जमावाने ते वाहन पेटवले. त्यानंतर जमावाकडून चालकालाही बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथे पवनचक्कीच्या वाहनाने दोघांना चिरडलं. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिले. चांद शेख आणि वसंत जगताप अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. पवनचक्कीसाठी वाळू सिमेंट खडीचं मिश्रण वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला. या भागातून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास नागरिकांनी यापूर्वी विरोध केला होता, त्यानंतरही वाहतूक सुरू होती. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी वाहन पेटवून दिले. वाहनचालकालाही बेदम चोप देण्यात आला. पोलिसांनी या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.