शिमग्यासाठी गावाकडे जाणाऱ्यांना मोठा दिलासा
होळीनिमित्त मध्य रेल्वेकडून १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय
मुंबई, पुणे ते उत्तर भारत आणि कोकण मार्गावर विशेष सेवा
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. शिमग्यासाठी गावाला जाण्यासाठी प्लान करत असाल तर यंदा तुमचा रेल्वे प्रवास गर्दीमुक्त आणि सुसाट होणार आहे. मध्य रेल्वेकडून १८६ विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. यामध्ये ९४ होळी विशेष आणि ९२ विशेष गाड्यांची सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे होळीनिमित्त गावी जाणाऱ्यांनी आताच ट्रेनची लिस्ट पाहून तिकीट बुक करावे.
कोकणासह राज्यभरात होळीनिमित्त गावी जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. या सर्वांना गावाकडे जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने या विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई – नागपूर/ सावंतवाडी रोड/ बनारस / गोरखपूर / समस्तीपूर /दानापूर तसेच पुणे – नागपूर /हजरत निजामुद्दीन / दानापूर दरम्यान एकूण १८६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ९४ होळी विशेष गाड्या आणि ९२ विशेष गाड्या असणार आहेत.
1. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (10 सेवा)
ट्रेन क्रमांक 02141 द्वि-साप्ताहिक विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर रविवार आणि मंगळवारी 22 फेब्रुवारी ते 8 मार्चदरम्यान 12.20 वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ३.१० वाजता पोहचेल.
ट्रेन क्रमांक 02142 नागपूर येथून दर रविवार आणि मंगळवारी 8 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 1.30 वाजता पोहोचेल.
या गाड्या दिनांक 22 फेब्रुवारी आणि 24 फेब्रुवारी रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक 1 मार्च, ३ मार्च आणि 8 मार्च रोजी होळी विशेष (6 सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
थांबा - दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
2. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (4 सेवा)
ट्रेन क्रमांक 01171 26 फेब्रुवारी आणि ५ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दर गुरुवारी 12.20 वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे 12.30 वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01172 26 फेब्रुवारी आणि 5 मार्च रोजी सावंतवाडी रोड येथून 5.20 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी 3.45 वाजता पोहचेल.
या गाड्या 26 फेब्रुवारी रोजी विशेष गाड्या (2 सेवा) आणि 5 मार्च रोजी होळी विशेष (2 सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
थांबा- दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.
3. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) – गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01079 दैनिक विशेष दि. २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज २२.३० वा. सुटेल व गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी १०.०० वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01080 विशेष २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान गोरखपूर येथून दररोज १४.३० वा. सुटेल व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ होळी विशेष (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा, बस्ती व खलीलाबाद.
४. लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01119 विशेष दि. २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून
दर गुरुवारी २२.१५ वा.सुटेल व सावंतवाडी रोड येथे दुसऱ्या दिवशी ०९.३० वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01120 विशेष दि. २७.०२.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी सावंतवाडी येथून दर शुक्रवारी १७.२० वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २६.०२.२०२६ व २७.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०५.०३.२०२६ व ०६.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, ७ वातानुकुलीत तृतीय, ८ शयनयान, १ पॅन्ट्री कार व २ जनरेटर कार.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग व कुडाळ.
५. लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस द्विसाप्ताहिक विशेष (८ सेवा)
ट्रेन क्रमांक. 01073 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर बुधवार व गुरुवारी १२.१५ वाजता सुटेल व बनारस येथे तिसऱ्या दिवशी ०१.१० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक. 01074 द्विसाप्ताहिक विशेष दिनांक २७.०२.२०२६, २८.०२.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी बनारस येथून दर शुक्रवार व शनिवारी ०६.३५ वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.४० वाजता पोहोचेल.
या गाड्या दिनांक २५.०२.२०२६, २६.०२.२०२६, २७.०२.२०२६ व २८.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६, ०५.०३.२०२६, ०६.०३.२०२६ व ०७.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती जं., बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओरई, गोविंदपुरी, फतेहपूर, सुबेदारगंज आणि वाराणसी जं. (फक्त 01073 साठी).
६. लोकमान्य टिळक टर्मिनस – समस्तीपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक. 01043 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर मंगळवारी १२.१५ वाजता सुटेल व समस्तीपूर येथे दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक. 01044 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी समस्तीपूर येथून दर गुरुवारी ०३.०० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १६.२५ वाजता पोहोचेल.
या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, सोनपूर, हाजीपूर आणि मुजफ्फरपूर.
७. लोकमान्य टिळक टर्मिनस – दानापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष (३२ सेवा)
ट्रेन क्रमांक. 01143 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ पर्यंत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दररोज १०.३० वाजता सुटेल व दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १८.४५ वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक. 01144 दैनिक विशेष दिनांक २२.०२.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत दानापूर येथून दररोज २१.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०७.४५ वाजता पोहोचेल.
या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ पर्यंत विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते ०९.०३.२०२६ पर्यंत होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ६ वातानुकुलीत तृतीय, ९ शयनयान, ४ सामान्य द्वितीय आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाळ उपाध्याय जं., बक्सर आणि आरा.
८. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक. 01469 साप्ताहिक विशेष दिनांक २४.०२.२०२६ व ०३.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर मंगळवारी १५.५० वाजता सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल.
ट्रेन क्रमांक. 01470 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर बुधवारी ०८.०० वाजता सुटेल व त्याच दिवशी २३.३० वाजता पुणे येथे पोहोचेल.
या गाड्या दिनांक २४.०२.२०२६ व २५.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०३.०३.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: ३ वातानुकुलीत द्वितीय, १५ वातानुकुलीत तृतीय, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.
९. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 01457 साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ व ०४.०३.२०२६ रोजी पुणे येथून दर बुधवारी १५.५० वा. सुटेल व नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01458 साप्ताहिक विशेष दिनांक २६.०२.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी नागपूर येथून दर गुरुवारी ०८.०० वा. सुटेल व पुणे येथे त्याच दिवशी २३.३० वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २५.०२.२०२६ व २६.०२.२०२६ रोजी विशेष गाड्या (२ सेवा) आणि दिनांक ०४.०३.२०२६ व ०५.०३.२०२६ रोजी होळी विशेष गाड्या (२ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ प्रथम वातानुकुलीत, १ वातानुकुलीत द्वितीय, २ वातानुकुलीत तृतीय, ५ शयनयान, ६ सामान्य द्वितीय व २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धमणगाव व वर्धा.
१०. पुणे – दानापूर – पुणे द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 01481 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते ०६.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून सोमवार व शुक्रवारी १९.५५ वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०८.०० वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01482 द्वि-साप्ताहिक विशेष दिनांक २५.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून बुधवार व रविवारी १०.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २३.०२.२०२६ ते ०१.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (४ सेवा) आणि दिनांक ०२.०३.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (४ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.
११. पुणे – दानापूर – पुणे दैनिक विशेष (३२ सेवा)
ट्रेन क्रमांक 01449 दैनिक विशेष दिनांक २१.०२.२०२६ ते ०८.०३.२०२६ दरम्यान पुणे येथून दररोज १५.३० वा. सुटेल व दानापूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वा. पोहोचेल.
ट्रेन क्रमांक 01450 दैनिक विशेष दिनांक २३.०२.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान दानापूर येथून दररोज ०५.०० वा. सुटेल व पुणे येथे दुसऱ्या दिवशी १८.१५ वा. पोहोचेल.
या गाड्या दिनांक २१.०२.२०२६ ते ०२.०३.२०२६ दरम्यान विशेष गाड्या (१६ सेवा) आणि दिनांक ०१.०३.२०२६ ते १०.०३.२०२६ दरम्यान होळी विशेष गाड्या (१६ सेवा) म्हणून चालवण्यात येतील.
संरचना: १ वातानुकुलीत द्वितीय, ५ वातानुकुलीत तृतीय, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय व २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
थांबे: दौंड कॉर्ड केबिन, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय जं., बक्सर व आरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.