Holi Celebration  Saam TV
महाराष्ट्र

Holi Celebration : रंगिबेरंगी रंगांनी सजली बाजारपेठ; महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्साहात होळी साजरी

Holi Celebration in Maharashtra : या वर्षी देखील हवलाय देवी मित्र मंडळाच्या वतीने होळीच्या 15 दिवस आधी पासूनच विविध मनोरंजनात्मक खेळ खेळत होळी उत्सवाची सुरुवात करण्यात आलीये.

Ruchika Jadhav

Holi News :

संपूर्ण देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. होळी सणानिमित्त राज्यात ठिकठिकाणी बाजारपेठा सजल्या आहेत. मुंबईसह पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात विविध पद्धतीने रंगांची उधळण करत उस्ताहात होळी साजरी केली जात आहे.

नवी मुंबईत पारंपरिक आगरी कोळी पद्धतीने होळीचा उत्साह

नवी मुंबईतील वाशी येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. या वर्षी देखील हवलाय देवी मित्र मंडळाच्या वतीने होळीच्या 15 दिवस आधी पासूनच विविध मनोरंजनात्मक खेळ खेळत होळी उत्सवाची सुरुवात करण्यात आलीये.

होळीच्या एक दिवस आधी सोंग घेत गावातील ग्रामस्थांनी वाजत गाजत मिरवणूक काढलीये. यावेळी कोणी एलईडी साडी, कोणी दुबईचा शेख तर कोणी पारंपारिक कोळी वेश परिधान करुन मिरवणुकीत काढली होती.

धारावी पुनर्विकासाच्या समर्थनार्थ पारंपारिक होळी

संत कक्क्या विकास संस्था आणि फौजी क्रीडा मंडळ यांच्यावतीने धारावी येथे पारंपारिक होळीचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध अभिनेते दिगंबर नाईक हे यावेळी धारावीच्या पुनर्विकासासाठी गाऱ्हाणे घालणार असून धारावीतील नागरिक पारंपरिक वेशात मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. स्थानिक खासदार राहुल शेवाळे यावेळी होळीच्या दर्शनासाठी येणार आहेत.

छत्रपती संभाजीनगर होळीच्या रंगात रंगले

छत्रपती संभाजीनगर संपूर्ण शहरावर होळीचा रंग चढला असून होळीचे रंग आणि पिचकारीची जोरदार विक्री देखील होत आहे. कालपासूनच खरेदीसाठी बाजारात गर्दी उसळलीये. रंगांचे दुकान, दहन करण्यासाठी लागणाऱ्या गौऱ्या , पिचकारी अशा अनेक गोष्टींची दुकाने मोठ्या थाटात सजलेली आहे.

शहरातील ५० पेक्षा अधिक चौकांत होळी दहन करण्यात येणार आहे. राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोर सायंकाळी मानाच्या होळीचे दहन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगरात राजकीय होळी रंगेल हे मात्र नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कल्याण डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा! पलावा पुल आजपासून नागरिकांसाठी सुरू|VIDEO

Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण योजनेचे वर्षभरात एकूण किती मिळाले पैसे?

Uday Samant : 'मराठी शिकणारच नाही, ही एक मस्ती आहे'; उदय सामंतांची सुशील केडिया यांच्यावर संतापजनक प्रतिक्रिया

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

SCROLL FOR NEXT