Nandurbar Saam Tv News
महाराष्ट्र

Nandurbar Hit and Run: वाढदिवसाच्या दिवशीच काळाचा घाला, फॉर्च्यूनरनं आई - मुलाला चिरडलं, नंदुरबारात हीट अँड रन

Hit and Run Incident Nandurbar Crime: शहादा शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. रस्त्यावरून पायी जात असलेल्या आईसह मुलाला एका भरधाव वाहनाने चिरडले आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

Bhagyashree Kamble

सागर निकवाडे, साम टीव्ही

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात हिट अँड रनची घटना घडली आहे. वाढदिवस साजरा केल्यानंतर रस्त्यावरून पायी जात असलेल्या आई आणि मुलाला एका भरधाव वाहनानं चिरडलं आहे. नंतर चालक फरार झाला आहे. या अपघातात २२ वर्षीय मुलासह ५४ वर्षीय आईचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कार चालकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. हिट अँड रनमुळे आई आणि मुलाचा रस्त्यावर जागीच मृत्यू झाला आहे. फॉर्च्यूनर कारनं आई आणि मुलाला धडक देत चिरडले असून, या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. आईचं नाव कमळाबाई तर, मुलाचं नाव आकाश असल्याची माहिती समोर आली आहे.

नेमकं घडलं काय?

वाढदिवस साजरा केल्यानंतर आई कमळाबाई आणि मुलगा आकाश पायी रस्त्यावरून जात होते. नंतर रस्त्यावरून भरधाव वेगाने फॉर्च्यूनर गाडी आली. सुसाट वेगाने येणाऱ्या गाडीने रस्त्यावर चालत असलेल्या आई आणि मुलाला धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

त्यांच्यासोबत एक कुत्रा देखील होता. कुत्रा देखील गाडीच्या चाकाखाली आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

धडक दिल्यानंतर चालक फरार झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, कार चालकविरोधात शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. हिट अँड रनमध्ये आई आणि मुलाचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात शोक व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT