Hira Maruti idol in Jalgaon Pahur  Saam Tv News
महाराष्ट्र

Jalgaon News : बजरंगबलीच्या मूर्ती स्थलांतरावेळी वानर सेनेचं आगमन, हनुमानाचा अनोखा चमत्कार? जळगावात थरार

Army of Monkeys during the Migration of Hanuman Idol : अखेर काही वेळानंतर वानर स्वतःहून मंदिर परिसरातून निघून गेले, आणि मूर्तीचे स्थलांतर यशस्वीरीत्या पूर्ण झालं.

Prashant Patil

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील पहुर येथे भव्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती. मात्र, मंदिराच्या नव्या आराखड्यात २० फूट उंच हिरा मारुतीची मूर्ती अडथळा ठरत असल्याने, तिला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मूर्ती हलवण्याचे कसोशीचे प्रयत्न सुरू होते. अखेर, सर्व अडचणींवर मात करून मूर्ती स्थलांतराचा अंतिम टप्पा सुरू झाला. मात्र, त्याचक्षणी अचानक वानरांची मोठी सेना मंदिर परिसरात धावून आली. या अनपेक्षित घटनेनं संपूर्ण गावात खळबळ माजली.

श्रीराम मंदिराच्या नव्या उभारणीसाठी मंदिर समितीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु होते. मंदिराचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन तथा त्यांच्या सहकार्याने भरीव आर्थिक मदत मिळवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिर उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला. मात्र, मूर्तीच्या जागेमुळे आराखड्यात अडथळा निर्माण झाल्याने तिचे स्थलांतर अपरिहार्य होते.

जेव्हा मूर्ती स्थलांतर करण्याचे काम सुरू होते, तेव्हा अचानक वानरांची मोठी सेना मंदिराभोवती गोळा झाली. काही वानर थेट मूर्तीच्या दिशेने झेपावत होते, तर काही स्थलांतराच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांभोवती घुटमळत होते. हे दृश्य पाहून उपस्थित भाविक स्तब्ध झाले. गावकऱ्यांनी त्वरित या घटनेला हनुमानाची कृपा मानली आणि मंत्रोच्चार, आरती, पूजन सुरू केले. काहींनी वानरांना फळे अर्पण केली, काहींनी जय हनुमानच्या गजरात मूर्ती स्थलांतराचे काम सुरू ठेवले.

अखेर काही वेळानंतर वानर स्वतःहून मंदिर परिसरातून निघून गेले, आणि मूर्तीचे स्थलांतर यशस्वीरीत्या पूर्ण झालं. या अद्भुत घटनेनंतर पहुरमध्ये एक अनोखी भक्तीमय ऊर्जा निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT